आजही एकुलता एक…!; जळगाव जामोदमध्ये आढळला पॉझिटिव्‍ह

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 19 ऑगस्टला अवघा एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला असून, जळगाव जामोद शहरातील कृष्णानगरातील हा रुग्ण आहे. एका रुग्णाला बरा झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 29 रुग्ण उपचार घेत आहेत. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1959 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1958 …
 
आजही एकुलता एक…!; जळगाव जामोदमध्ये आढळला पॉझिटिव्‍ह

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 19 ऑगस्‍टला अवघा एक कोरोना पॉझिटिव्‍ह रुग्‍ण आढळला असून, जळगाव जामोद शहरातील कृष्णानगरातील हा रुग्‍ण आहे. एका रुग्‍णाला बरा झाल्याने डिस्‍चार्ज देण्यात आला आहे. सध्या 29 रुग्‍ण उपचार घेत आहेत.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1959 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1958 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 1 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आला आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील एका अहवालाचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 468 तर रॅपिड टेस्टमधील 1490 अहवालांचा समावेश आहे.

आजपर्यंत 673488 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86662 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 1958 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 87363 कोरोनाबाधित रुग्ण असून, सद्यःस्थितीत कोविडचे 29 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 672 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.