आजही 8 बळी! 728 नवे पॉझिटिव्ह रुग्‍ण; देऊळगाव राजात स्फोट!!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सलग 3 दिवस 4 आकडी पराक्रम गाजविल्यावर आज, 3 एप्रिलला तीन आकडी पॉझिटिव्ह संख्या दिसून आली! मात्र बाधित संख्या 728 असली तरी कोरोना बाधित होण्याचा दर (पॉझिटिव्हीटी रेट) तब्बल 33.93 टक्क्यांपर्यंत पोहोचलाय! ही बाब ‘खतरेकी घंटी’ मानली जात आहे. देऊळगाव राजामधील कोरोनाचा स्फोट (267रुग्ण) हा या धोक्याचा …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः सलग 3 दिवस 4 आकडी पराक्रम गाजविल्यावर आज, 3 एप्रिलला तीन आकडी पॉझिटिव्ह संख्या दिसून आली! मात्र बाधित संख्या 728 असली तरी कोरोना बाधित होण्याचा दर (पॉझिटिव्हीटी रेट) तब्बल 33.93 टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचलाय! ही बाब ‘खतरेकी घंटी’ मानली जात आहे. देऊळगाव राजामधील कोरोनाचा स्फोट (267रुग्ण) हा या धोक्याचा कळस ठरावा.

सुट्ट्यांमुळे नमुने संकलनात 2177 अशी घट आली. मात्र मागील प्रलंबित व हे मिळून 6518 जणांचे अहवाल प्राप्त झाले. यातील 728 पॉझिटिव्ह आढळलेत. कोरोनाचा धुमाकूळ सुरू असलेल्या देऊळगावराजात 24 तासांत 267 रुग्ण आढळले. त्या तुलनेत सिंदखेडराजामध्ये 22 रुग्ण निघाले. मात्र मतदारसंघातील आकडा पावणे तीनशे निघणे ही पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांची काळजी वाढविणारी बाब ठरावी. बुलडाणा मतदारसंघात तर कोरोनाचा प्रकोप कायमच आहे. बुलडाणा तालुका 101 अन्‌ मोताळा 79 हे आकडेच बोलके आहेत. शेगावमध्ये (98) कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. याशिवाय लोणार 69, जळगाव जामोद 58 या तालुक्यांतील संख्या लक्षणीय आहे. यातुलनेत कोरोनाचा प्रकोप कायम असलेल्या खामगाव व चिखली (प्रत्येकी 10) मेहकर 7, मलकापूर 1 आणि नांदुरा 4 या तालुक्यांतील कमी संख्या केवळ सुखद व तात्पुरता योगायोग असून त्याने हुरळून जाण्याचे कारण नाही.

1275 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2003 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1275 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 728 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 568 व रॅपिड टेस्टमधील 160 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 452 तर रॅपिड टेस्टमधील 823 अहवालांचा समावेश आहे.

1135 रुग्णांची कोरोनावर मात

आज 1135 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत 364487 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 59765 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 5710 नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहे. जिल्ह्यात आज अखेर एकूण 66710 कोरोनाबाधित रुग्ण असून, सध्या रुग्णालयात 6578 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 427 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

8 बळी

दरम्यान, रुग्णसंख्या कमी जास्त काहीही येवो, मृत्यूचे तांडव मात्र थांबायला तयार नाही! गत 24 तासांत 8 जणांचे मृत्यू ओढावले. उपचारादरम्यान केसापूर (ता. बुलडाणा) येथील 36 वर्षीय पुरुष, बुलडाणा येथील 55 वर्षीय पुरुष, खंडाळा म. (ता. चिखली) येथील 42 वर्षीय पुरुष, पोरज (ता. खामगाव) येथील 71 वर्षीय महिला, जळगाव जामोद येथील 55 वर्षीय पुरुष, राहुड (ता. खामगाव) येथील 80 वर्षीय पुरुष, कुंबेफळ (ता. खामगाव) येथील 85 वर्षीय पुरुष, निमगाव (ता. नांदुरा) येथील 70 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.