आजारपणाला कंटाळून 30 वर्षीय गतिमंद महिलेची आत्महत्या

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः आजारपणाला कंटाळून 30 वर्षीय गतिमंद महिलेने आत्महत्या केल्याची घटना 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता समोर आली.रानतीबाई जगदीश खरात (रा. उमापूर ता .जळगाव जामोद) गेल्या तीन- चार वर्षांपासून आजारी होत्या. त्यातच गतिमंद असल्याने कोठेही फिरायच्या, बरेच उपचार करूनही काहीच फरक पडला नव्हता. त्यांनी आजारपणाला कंटाळून 13 फेब्रुवारी रोजी उमापूर शिवारात पळसाच्या …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः आजारपणाला कंटाळून 30 वर्षीय गतिमंद महिलेने आत्महत्या केल्याची घटना 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता समोर आली.
रानतीबाई जगदीश खरात (रा. उमापूर ता .जळगाव जामोद) गेल्या तीन- चार वर्षांपासून आजारी होत्या. त्यातच गतिमंद असल्याने कोठेही फिरायच्‍या, बरेच उपचार करूनही काहीच फरक पडला नव्हता. त्‍यांनी आजारपणाला कंटाळून 13 फेब्रुवारी रोजी उमापूर शिवारात पळसाच्या झाडाला साडीने गळफास घेतला.