आजारातून बरे होण्यासाठी सांगितला “शरीरसंबंधा’चा उपचार!; उपचारही स्वतःच करणार म्‍हणे!!; प्रसिद्ध बोगस डॉक्‍टरच्या पोलिसांनी आवळल्‍या मुसक्या!!

मुंबई : आजारातून बरे व्हायचे असेल तर तुला माझ्यासोबत शरीरसंबंध ठेवावे लागतील, असा सल्ला देणाऱ्या डॉक्टरचे बिंग तरुणीने फोडले आहे. मुंबईच्या विरारमध्ये ही घटना समोर आली. या डॉक्टरने अशाप्रकारे किती तरुणी, महिलांचे शोषण केले, याचा तपास आता पोलीस करत आहेत. झाले असे, की हैदराबादच्या पीडित तरुणीला स्किजोफ्रिनिया आजार होता. या आजारातून बरे होण्यासाठी तिने अनेक …
 
आजारातून बरे होण्यासाठी सांगितला “शरीरसंबंधा’चा उपचार!; उपचारही स्वतःच करणार म्‍हणे!!; प्रसिद्ध बोगस डॉक्‍टरच्या पोलिसांनी आवळल्‍या मुसक्या!!

मुंबई : आजारातून बरे व्‍हायचे असेल तर तुला माझ्यासोबत शरीरसंबंध ठेवावे लागतील, असा सल्ला देणाऱ्या डॉक्‍टरचे बिंग तरुणीने फोडले आहे. मुंबईच्‍या विरारमध्ये ही घटना समोर आली. या डॉक्‍टरने अशाप्रकारे किती तरुणी, महिलांचे शोषण केले, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

झाले असे, की हैदराबादच्‍या पीडित तरुणीला स्किजोफ्रिनिया आजार होता. या आजारातून बरे होण्यासाठी तिने अनेक डॉक्‍टरांकडे उपचार घेतले. मात्र यश आले नाही. अशातच तिला यु ट्यूबवर डॉ. कैलास मंत्रीबद्दल कळले. डॉ. मंत्री हा दुसऱ्याची माहिती स्वतःच्‍या नावावर या यू ट्यूबद्वारे खपवत होता. तरुणीने त्‍याचे व्हिडिओ बघून त्‍याच्‍याशी संपर्क केला. प्रसिद्धत मनोविकार तज्‍ज्ञ असल्याचे भासवून त्‍याने विरारमध्ये दवाखानाही सुरू केलेला होता.

ही तरुणी त्याच्याकडे गेली तेव्हा त्‍याने उपचाराच्या नावाखाली ९ लाख रुपये उकळले. मात्र तरीही ती बरी झाली नाही. तिने डॉक्‍टरांना याबद्दल विचारले असता त्‍याने तुला कायमस्वरुपी या आजारातून बरे व्हायचे असेल तर रोज कुणाशी तरी शारीरिक संबंध ठेवावे लागतील, असा सल्ला दिला व या कामासाठी आपणही तयार असल्याचे तिला सांगितले. तिने ही बाब घरी सांगितली. त्‍यामुळे घरच्यांनी तातडीने तिला घेऊन विरार पोलीस ठाण्यात डॉ. मंत्रीविरुद्ध तक्रार दिली. नंतरच्‍या तपासात तो बोगस डॉक्टर असल्याचेही समोर आले.