आजाराला कंटाळून वृद्धाने घेतला गळफास, खामगाव शहरातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गोठ्यात टिनपत्र्याच्या लोखंडी अँगलला गळफास घेऊन 65 वर्षीय वृद्धाने आत्महत्या केली. ही घटना खामगाव शहरातील गोपाळनगरात आज, 26 मार्चला सकाळी समोर आली. नानाराव जयराम पारखे असे या वृद्धाचे नाव आहे. त्यांनी आजाराला कंटाळून आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येते. पत्नी आशाबाई यांना नानारावांनी आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना …
 

खामगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः गोठ्यात टिनपत्र्याच्‍या लोखंडी अँगलला गळफास घेऊन 65 वर्षीय वृद्धाने आत्‍महत्‍या केली. ही घटना खामगाव शहरातील गोपाळनगरात आज, 26 मार्चला सकाळी समोर आली.

नानाराव जयराम पारखे असे या वृद्धाचे नाव आहे. त्‍यांनी आजाराला कंटाळून आत्‍महत्‍येचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येते. पत्‍नी आशाबाई यांना नानारावांनी आत्‍महत्‍या केल्याचे दिसून आले. त्‍यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिल्‍यानंतर पोलिसांनी घटनास्‍थळी येऊन पंचनामा केला. या प्रकरणी आकस्‍मिक मृत्‍यूची नोंद करण्यात आली आहे.