आजीबाईच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पोबारा; बुलडाणा शहरातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ६० वर्षीय आजीबाईच्या गळ्यातील मंगळसूत्र व पोत अनोळखी चोरट्याने हिसकावून पोबारा केला. ही घटना काल, १५ जुलैला सकाळी साडेदहाच्या सुमारास बुलडाणा शहरातील सुंदरखेड परिसरातील चेतनानगरात घडली. याप्रकरणी आजीच्या तक्रारीवरून पोलिसांनी अनोळखी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अहिल्याबाई हरी धनवटे (६०) यांच्या घराचे बांधकाम चेतनानगरात सुरू आहे. त्यांचे पूत्र संदीप धनवटे …
 
आजीबाईच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पोबारा; बुलडाणा शहरातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः ६० वर्षीय आजीबाईच्या गळ्यातील मंगळसूत्र व पोत अनोळखी चोरट्याने हिसकावून पोबारा केला. ही घटना काल, १५ जुलैला सकाळी साडेदहाच्या सुमारास बुलडाणा शहरातील सुंदरखेड परिसरातील चेतनानगरात घडली. याप्रकरणी आजीच्‍या तक्रारीवरून पोलिसांनी अनोळखी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अहिल्याबाई हरी धनवटे (६०) यांच्या घराचे बांधकाम चेतनानगरात सुरू आहे. त्यांचे पूत्र संदीप धनवटे पोलीस विभागात नोकरीला आहेत. मुलगा ड्युटीवर जात असल्याने अहिल्याबाई आणि त्यांचे पती घराच्या बांधकामावर लक्ष ठेवतात. काल सकाळी साडेदहाला त्या बांधकामाच्या ठिकाणी हजर असताना अनोळखी व्यक्ती त्यांच्याकडे आला. तुमच्या कामावर विटांचा ट्रक आणला आहे. त्याचे पैसे द्या, असे तो म्हणाला. तेव्हा पैसे माझा मुलगा देईल, असे आजीने सांगितले. तेव्‍हा “साहेब लवकर येत नाहीत.

गाडीत पेट्रोल भरायचे आहे. तुम्हीच पैसे द्या’ असे म्हणत त्याने आजीच्या गळ्यातील मंगळसूत्र व पोत हिसकावून पोबारा केला. गळ्यातील सोन्याचे गोल मनी ३ ग्रॅम (किंमत १० हजार रुपये) व मंगळसूत्र (किंमत ११ हजार) असा २१ हजार रुपयांचे दागिने घेऊन पसार झाला. आजीबाईंनी आरडाओरड केली, तेव्हा आजूबाजूचे लोक धावत आले तोपर्यंत तो दुचाकीने सुसाट पसार झाला होता. अनोळखी चोरट्याचे वय अंदाजे ३५ ते ४० वर्षे असून, बांधा मजबूत, चेहरा गोल व अंगात मुरूम कलरचे शर्ट घातले होते. त्या अनोळखी व्यक्तीला पुन्हा पाहिल्यास मी ओळखू शकते, असे आजींनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.