आज, आत्ता, ताबडतोबच्या धोरणामुळे वैतागल्या आरोग्यसेविका!

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः हे शीर्षक वाचून तुम्ही देखील वैतागला असाल, पण आरोग्य विभागाचे शेकडो आरोग्य सेवक व सेविका तर या शब्दांना नुसतेच वैतागले नसून, त्यामुळे त्यांना विविध शारीरिक ,मानसिक आजारही जडत आहेत. वरिष्ठांच्या या आततायी व मनमानी कार्यशैलीमुळे त्रस्त या कर्मचार्यांनी अखेर याला कंटाळून थेट जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः हे शीर्षक वाचून तुम्ही देखील वैतागला असाल, पण आरोग्य विभागाचे शेकडो आरोग्य सेवक व सेविका तर या शब्दांना नुसतेच वैतागले नसून, त्यामुळे त्यांना विविध शारीरिक ,मानसिक आजारही जडत आहेत. वरिष्ठांच्या या आततायी व मनमानी कार्यशैलीमुळे त्रस्त या कर्मचार्‍यांनी अखेर याला कंटाळून थेट जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडेच आपले गार्‍हाणे मांडले.

ग्रामीण भागातील आरोग्य कर्मचार्‍यांचे काम थेट रुग्ण, घरोघरी जाऊन करायचे आहे. आरोग्यसेवकाकडे अगोदरच आरोग्यविषयक 6 कार्यक्रमांची जवाबदारी आहे. तसेच तब्बल 30 ते 40 आरोग्यविषयक कामांची (योजनांची) जबाबदारी आहे. या कामाचे भरमसाठ अहवाल देखील त्यांना वरिष्ठाना सादर करावे लागतात. यासाठी त्यांच्यामागे ससेमिरा लावला जातो, आजच द्या, आत्ताच द्या, ताबडतोब द्या, असे सांगून तात्काळ अहवाल न दिल्यास कारवाईचा दम दिला जातो. त्यातच एनसिडी कार्यक्रमाचे डेटा एंट्रीचे काम देखील त्यांच्यामागे लावून देण्यात आले आहे, अशा शब्दांत जि.प. आरोग्य कर्मचारी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी जि.प. सीईओ यांच्याकडे कैफियत मांडली. यावेळी जिल्हाध्यक्ष अनिल लोखंडे, कार्याध्यक्ष प्रकाश वडोदे, एस. वाय. पर्‍हाड, कविता खाडे, मंजुषा मुळे, एन. आर. काकडे, वंदना काळूसे, शिवगंगा आघाव, मीरा कोगदे, गजानन डांगे, एम. डी. शेरोकार, दिलीप शिरसाट, संजय शिंदे, सुरेश सोनपसारे, विठ्ठल वायाळ, दिलीप सोनोने, शितलप्रसाद अहिर आदी पदाधिकारी हजर होते.