आज पावणे आठशे! 11 तालुक्यांतील कोरोनाचा धुमाकूळ कायम!!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : सलग दोन दिवस साडेआठशेचा पल्ला गाठत यंत्रणांना हादरवणाऱ्या कोरोनाने आज, 25 मार्चला आपला हादरा कमी केला! कोविड कुमारने 773 वरच थांबण्याची तसदी घेतली! तेरापैकी तब्बल 11 तालुक्यांतील कोरोना प्रकोप कायम असल्याचे निगेटिव्ह चित्र पॉझिटिव्हचा आकडा पाहिल्यावर निर्माण झाले आहे. मागील काही दिवसांत स्वॅब नमुने संकलन वाढविण्यात आले …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) : सलग दोन दिवस साडेआठशेचा पल्ला गाठत यंत्रणांना हादरवणाऱ्या कोरोनाने  आज, 25 मार्चला आपला हादरा कमी केला! कोविड कुमारने 773 वरच थांबण्याची तसदी घेतली! तेरापैकी तब्बल 11 तालुक्यांतील कोरोना प्रकोप कायम असल्याचे निगेटिव्ह चित्र पॉझिटिव्हचा आकडा पाहिल्यावर निर्माण झाले आहे.

मागील काही दिवसांत स्वॅब नमुने संकलन वाढविण्यात आले असून, रॅपिड टेस्टवर भर देण्यात आला आहे. यामुळे गत्‌ 24 तासांत संकलित 5087 नमुन्यांमध्ये आरटीपीसीआर 1262 च्या तुलनेत  रॅपिड 3787 इतके म्हणजे तिप्पट आहेत. यातील 5018 चे अहवाल प्राप्त झाले असून, 4216 जण नशीबवान (अर्थात निगेटिव्ह) ठरले. मात्र 773 जणांचे नशीब चांगले नसल्याने ते पॉझिटिव्ह आलेत. यात टॉपर कोण हा प्रश्न विचारायचे कामच काय, असे सध्याचे विचित्र चित्र आहे. बुलडाणा तालुका जवळपास रोज शंभराचा आकडा गाठत जिल्ह्याचे नेतृत्व करत आहे. गत 24 तासांत तालुक्यात 132 पॉझिटिव्ह आढळून आलेत.

धुमाकूळच…

बुलडाणा तालुक्यात कोरोना हैदोस घालत आहे. मुख्यालयी रोज सरासरी 60 रुग्ण आढळत आहेत. ग्रामीण भागात हीच गती आहे. डोंगरखंडाळा, सुंदरखेड, शिरपूर, कोलवड,अजीसपूर सागवान ते धाड, चांदोल, अशा उभ्या आडव्या पट्ट्यात कोरोना पसरत चाललाय!

खामगाव तालुक्‍यात 80 रुग्ण, चिखली 60, मलकापूर 79, देऊळगाव राजा 78, नांदुरा 76  या टॉपर तालुक्यांतील रुग्ण संख्येचा उद्रेक कायम आहे. मात्र अनेक दिवस शांत व नियंत्रणात असलेल्या तालुक्यातही कोरोना चांगलाच आत घुसला. ही धोक्याची बाब ठरावी, सिंदखेड राजा 47, मोताळा 46, लोणार 62, मेहकर 55 या तालुक्यांची संख्याच बोलकी आहे.