आज फक्‍त ८ रुग्‍ण..!; कोरोनाची हकालपट्टी होण्याच्‍या मार्गावर..!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातून कोरोनाची हकालपट्टी होण्याच्या मार्गावर असून, आज, 9 जुलैला अवघे 8 रुग्ण समोर आल्याने आरोग्य यंत्रणेसह मोठा दिलासा सर्वांना मिळाला आहे. 50 रुग्णांना सुटी मिळाली असून, सध्या रुग्णालयांत 76 बाधितांवर उपचार सुरू आहेत. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 3158 अहवाल प्राप्त झाले आहेत. पैकी …
 
आज फक्‍त ८ रुग्‍ण..!; कोरोनाची हकालपट्टी होण्याच्‍या मार्गावर..!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातून कोरोनाची हकालपट्टी होण्याच्‍या मार्गावर असून, आज, 9 जुलैला अवघे 8 रुग्‍ण समोर आल्याने आरोग्‍य यंत्रणेसह मोठा दिलासा सर्वांना मिळाला आहे. 50 रुग्‍णांना सुटी मिळाली असून, सध्या रुग्णालयांत 76 बाधितांवर उपचार सुरू आहेत.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 3158 अहवाल प्राप्त झाले आहेत. पैकी 3150 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 8 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 2 व रॅपिड टेस्टमधील 6 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 572 तर रॅपिड टेस्टमधील 2578 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्ह आलेले अहवाल
चिखली तालुका : भालगाव 1, इसरूळ 1, शेलगाव आटोळ 1, बेराळा 1, सिंदखेड राजा तालुका : हिवरखेड 1, सिंदखेड राजा शहर : 1, बुलडाणा तालुका : मोहदरी 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 8 रुग्ण आढळले आहेत.

आजवर 664 कोरोनाबाधितांचा मृत्यू
आज 50 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. तसेच आजपर्यंत 597240 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86319 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 1635 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87059 कोरोनाबाधित रुग्ण असून, सध्या रुग्णालयात 76 बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत 664 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.