आज 606 पॉझिटिव्ह! बुलडाण्यात स्फोटक स्थिती!! सिंदखेडराजा, चिखलीतील उद्रेक कायम

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) ः नमुने संकलन व चाचण्यांचा वेग वाढला असतानाही पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा कमी येण्याचा दिलासादायक योग आज, 8 एप्रिलला जुळून आला! आज 606 बधितांचा आकडा आला आहे. यामुळे मिळालेला दिलासा किती तास टिकतो हे नक्की नसतानाच बुलडाणा तालुक्यातील आकडे स्फोटक ठरत असल्याचे धककदायक चित्र आहे. रॅपिड 4492 व आरटीपीसीआर 1534 मिळून 6081 स्वॅब …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) ः नमुने संकलन व चाचण्यांचा वेग वाढला असतानाही पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा कमी येण्याचा दिलासादायक योग आज, 8 एप्रिलला जुळून आला! आज 606 बधितांचा आकडा आला आहे. यामुळे मिळालेला दिलासा किती तास टिकतो हे नक्की नसतानाच बुलडाणा तालुक्यातील आकडे स्फोटक ठरत असल्याचे धककदायक चित्र आहे.

रॅपिड 4492 व आरटीपीसीआर 1534  मिळून 6081 स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. यापैकी 5462 चे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 606 पॉझिटिव्ह आले असून, 4836 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मात्र बुलडाणा तालुक्याच्या संख्येने (166 पॉझिटिव्ह) हा दिलासा नाममात्र ठरवला. याचबरोबर चिखली 71, सिंदखेड राजा 78,  मोताळा 63, नांदुरा 43 या तालुक्यातील कोविडचा उद्रेक कायम असल्याचे चित्र आहे. या तुलनेत इतर तालुक्यांतील आकडे काहीसे नियंत्रणात असल्याचे चित्र तूर्तास तरी आहे. मेहकर 24, खामगाव 23, मलकापूर 35, लोणार 35, देऊळगाव राजा 21, शेगाव 18,  जळगाव जामोद 22 व संग्रामपूर 7 अशी रुग्णाची आकडेवारी आहे.