आज 768 पॉझिटिव्ह! खामगाव, बुलडाण्यातील स्फोट कायम, कोविडने व्यापले 12 तालुके !!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हचा आकडा सव्वा सातशेच्या वर निघणे जणू काही नियमच झालाय! काल, 732 पॉझिटिव्ह आले असतानाच आज, 20 मार्चलाही 768 रुग्ण निघाले आहेत. बुलडाणा व खामगाव तालुक्यातील कोरोनाबाधितांचा चिंताजनक आकडा कायम आहे. संग्रामपूर वगळता 12 तालुक्यांत झालेला आज समोर आलेला फैलाव गंभीर धोक्याची घंटा ठरला आहे. …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हचा आकडा सव्वा सातशेच्या वर निघणे जणू काही नियमच झालाय! काल, 732 पॉझिटिव्ह आले असतानाच आज, 20 मार्चलाही 768 रुग्ण निघाले आहेत. बुलडाणा व खामगाव तालुक्‍यातील कोरोनाबाधितांचा चिंताजनक आकडा कायम आहे. संग्रामपूर वगळता 12 तालुक्यांत झालेला आज समोर आलेला फैलाव गंभीर धोक्याची घंटा ठरला आहे. आज या तालुक्यांत किमान 30 ते 134 दरम्यान बाधितांची संख्या निघाली आहे.

संग्रामपूर तालुक्यात आज कागदोपत्रीतरी एकही रुग्ण नाही, ही दिलासादायी बाब. जिल्ह्याला यापेक्षा जास्त किंवा भरीव दिलासा द्यायला कोरोना ऊर्फ कोविड तूर्तास तरी तयार नाही. गेल्‍या 24 तासांत जिल्ह्यातील रुग्णसंख्येने 768 चा आकडा गाठला. यात आघाडीवरील बुलडाणा तालुक्याचे योगदान तब्बल 134 तर खामगावचे 107 इतके आहे. यात शतक हुकलेल्या शेगाव (84 रुग्ण), देऊळगावराजा ( 81), चिखली (45), नांदुरा ( 49) या आघाडीवरील तर मध्यंतरी शांत असलेल्या लोणार 52 रुग्‍ण, सिंदखेडराजा 61, मोताळा 43, जळगाव जामोद 51 पॉझिटिव्ह या तालुक्यांचाही महत्वाचा वाटा आहेच! कोरोनाचा चौफेर विस्तार जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाला आव्हान देणारा ठरत आहे.