आज 874 पॉझिटिव्ह! संग्रामपुरातही तब्‍बल 30 रुग्‍ण!!; सोशल मीडियावरील चर्चा ठरली खोटी

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) ः यंत्रणांच्या ‘हॉलिडे मूड’मुळे आठवड्याच्या अखेरीस नमुने संकलन व चाचण्यांची गती मंदावल्यावरही कोरोना पॉझिटिव्हचा आकडा नऊशेच्या घरात पोहोचला! तसेच पॉझिटिव्ही रेट (कोरोना बाधित होण्याचा दर) 29 टक्क्यांच्या घरात पोहोचला. यामुळे कोरोनाचा धोका नव्याने स्पष्ट झाला आहे. आज, 19 एप्रिलला जिल्ह्यात 874 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. विकेंडला स्वॅब नमुने संकलन व चाचण्यांचा वेग …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) ः यंत्रणांच्या ‘हॉलिडे मूड’मुळे आठवड्याच्या अखेरीस नमुने संकलन व चाचण्यांची गती मंदावल्यावरही कोरोना पॉझिटिव्हचा आकडा नऊशेच्या घरात पोहोचला! तसेच पॉझिटिव्ही रेट (कोरोना बाधित होण्याचा दर) 29 टक्‍क्‍यांच्‍या घरात पोहोचला. यामुळे कोरोनाचा धोका नव्याने स्पष्ट झाला आहे. आज, 19 एप्रिलला जिल्ह्यात 874 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

विकेंडला स्वॅब नमुने संकलन व चाचण्यांचा वेग मंदावतो हा आजवरचा अनुभव आहे. यंदाचा आठवडासुद्धा त्याला अपवाद नव्हता. गत्‌ 24 तासांत केवळ 2275 नमुने घेण्यात आले. तसेच हे व प्रलंबित मिळून 3080 अहवाल प्राप्त झाले. यातील 874 पॉझिटिव्ह आले असून, याचा पॉझिटिव्ही दर तब्बल 28.37 इतका आहे. जिल्ह्यात आघाडीवर कोण, या प्रश्नाचे उत्तर बुलडाणा तालुका असे उत्तर जवळपास रोजच मिळते. तालुक्याने जणू काही कोविडची ‘होल सेल डीलरशीप’ घेतली काय? असा मजेदार सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. तालुक्यात आज 197 रुग्ण आढळले. सिंदखेडराजा पाठोपाठ मलकापूर मतदारसंघात कोरोनाचा प्रकोप वाढलाय असे चित्र आहे. आज सोमवारी नांदुऱ्यात 107 तर मलकापूर तालुक्यात 66 कोरोना बाधित आढळले. सिंदखेड राजा मतदारसंघाचे चित्रही असेच आहे, देऊळगाव राजामध्ये 85 तर सिंदखेड राजामध्ये 52 रुग्ण आहेत. खामगाव (73  ,चिखली (81), शेगाव (69 बाधित) हे तालुके मागे नाहीच! मेहकर 40, लोणार 46, जळगाव जामोद 19, मोताळा 8 या तालुक्यांतील तीव्रता तात्पुरती कमी झाली असे म्हणता येईल. संग्रामपूरमध्ये 30 रुग्ण निघणे खरे तर ब्रेकिंग आहे! कारण संग्रामपूर तालुक्‍यात कोरोना आटोक्‍यात असल्याचा मॅसेज फिरून हे सर्व देवाच्‍या कृपेने घडत असल्याची अफवा पसरवली जात होती. गत 24 तासांत एकच रुग्ण दगावणे हाच काय तो दिलासा आहे. याचे कारण मागील काही दिवसांपासून रोजची बळींची सरासरी 6 इतकी आहे.