आठवडाभरात जिल्ह्यातून ९ बेपत्ता!; पैकी तिघांचे मृतदेह आढळले!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गेल्या आठवड्यात सोमवारपासून शनिवारपर्यंत तब्बल ९ जण बेपत्ता झाल्याची नोंद जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत करण्यात आली आहे. यात अल्पवयीनांचा समावेश नाही. तो धरला तर आकडा आणखी वाढतो. बेपत्ता झालेल्यांपैकी तिघांचे मृतदेह आढळले आहेत. केळवद (ता. चिखली) येथील राधाबाई नारायण हिवाळे (६५) ही महिला १५ ऑक्टोबरपासून बेपत्ता होती. तिचा काल दरीत …
 
आठवडाभरात जिल्ह्यातून ९ बेपत्ता!; पैकी तिघांचे मृतदेह आढळले!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गेल्या आठवड्यात सोमवारपासून शनिवारपर्यंत तब्‍बल ९ जण बेपत्ता झाल्याची नोंद जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत करण्यात आली आहे. यात अल्पवयीनांचा समावेश नाही. तो धरला तर आकडा आणखी वाढतो. बेपत्ता झालेल्यांपैकी तिघांचे मृतदेह आढळले आहेत.

केळवद (ता. चिखली) येथील राधाबाई नारायण हिवाळे (६५) ही महिला १५ ऑक्‍टोबरपासून बेपत्ता होती. तिचा काल दरीत खून झालेल्या अवस्‍थेतील मृतदेह आढळला. याशिवाय सर्जेदार बाबुराव माने (४७, रा. भालेगाव बाजार, ता. चिखली) व दुर्गा समाधान सावरकर (१८, कुंबेफळ, ता. खामगाव) या दोघांचे मृतदेह समोर आले होते. हे दोघेही ११ ऑक्‍टोबरला बेपत्ता झाले होते. दोघांचे मृतदेह १३ ऑक्‍टोबरला विहिरीत आढळले होते.

अन्य बेपत्ता असे…
जनुना (ता. खामगाव) येथील श्वेता सदानंद शेजव (१८) ही तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्‍या घरच्यांनी १५ ऑक्‍टोबरला शिवाजीनगर पोलीस ठाण्यात केली आहे. मलकापूर शहरातील शेख अमीर शेख रहेमान (२९, रा. मुंदडा पेट्रोलपंपजवळ, मलकापूर) हासुद्धा १५ ऑक्‍टोबरला बेपत्ता झाल्याची नोंद मलकापूर शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. ज्ञानगंगापूर (ता. खामगाव) येथील सौ. अनसया दिनेश जजंयकार (३०) ही विवाहिता १४ ऑक्‍टोबरला बेपत्ता झाल्याची नोंद पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात १४ ऑक्‍टोबरला करण्यात आली आहे. याच दिवशी विजय त्र्यंबक मावळे (५४, रा. नांदुरा खुर्द, वॉर्ड क्रमांक २१) हे बेप्‍ात्ता झाल्याची नोंद नांदुरा पोलीस ठाण्यात झाली आहे. चिंचोली (ता. शेगाव) येथील भारती वासुदेव ढगे (२५) ही विवाहिता बेपत्ता झाल्याची नोंद शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. देऊळगाव राजा तालुक्‍यातील सावखेड भोई येथील ४७ वर्षीय सर्जेराव बाबुराव माने हे बेपत्ता झाल्याची नोंद देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.