आठवडे बाजारात चोरट्यांचा 5 मोबाइलवर डल्ला!; बुलडाणा शहरातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा शहरातील रविवारी, 14 फेब्रुवारीला आठवडी बाजाराच्या दिवशी 5 मोबाइल लंपास झाल्याचा तक्रारी शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.एका मोबाइल चोरट्याला गेल्या महिन्यात बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेने पकडले होते. मात्र तरीही मोबाइल चोरीच्या घटना सुरूच आहेत. बुलडाणा शहरातील आशा किरण लोखंडे (रा. जिजामातानगर), समाधान अशोक वाघ (रा. पोलीस मुख्यालयामागे), पुरुषोत्तम …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा शहरातील रविवारी, 14 फेब्रुवारीला आठवडी बाजाराच्या दिवशी 5 मोबाइल लंपास झाल्याचा तक्रारी शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.
एका मोबाइल चोरट्याला गेल्या महिन्यात बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेने पकडले होते. मात्र तरीही मोबाइल चोरीच्या घटना सुरूच आहेत. बुलडाणा शहरातील आशा किरण लोखंडे (रा. जिजामातानगर), समाधान अशोक वाघ (रा. पोलीस मुख्यालयामागे), पुरुषोत्तम काशीनाथ माळी (रा. आयटीआय कॉलनी), गजानन पुंडलिक इंगळे (रा. चिंचोले चौक) व दीपक केशवराव इंगळे (रा. तुलसीनगर, बुलडाणा) यांचे हजारो रुपये किंमतीचे मोबाइल रविवारच्या आठवडी बाजारातून लंपास झाले असल्याच्या तक्रारी शहर पोलिसांत प्राप्त झाल्या आहेत.