आठवड्यातून ४ दिवस कोरोना लसीकरण! ‘कोविशिल्ड’ पुन्हा मैदानात

बुलडाणा (संजय मोहिते : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शुभारंभालाच जबदरदस्त कामगिरी बजावल्यावर २ दिवसांचा तांत्रिक ब्रेक घेतल्यावर जिल्ह्यातील कोरोना लसीकरण आज, १९ जानेवारीपासून पुन्हा सुरळीत सुरू झालंय! नवीन नियोजनानुसार आता आठवड्यातून ५ दिवस मोहीम राबविण्यात येत आहे.१६ जानेवारीच्या मुहूर्तावर जिल्ह्यात लसीकरण मोहिमेचा श्रीगणेशा करण्यात आला. बुलडाणा जिल्हा रुग्णालय, खामगाव, शेगाव, मलकापूर उप जिल्हा रुग्णालय तर …
 

बुलडाणा (संजय मोहिते : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शुभारंभालाच जबदरदस्त कामगिरी बजावल्यावर २ दिवसांचा तांत्रिक ब्रेक घेतल्यावर जिल्ह्यातील कोरोना लसीकरण आज, १९ जानेवारीपासून पुन्हा सुरळीत सुरू झालंय! नवीन नियोजनानुसार आता आठवड्यातून ५ दिवस मोहीम राबविण्यात येत आहे.
१६ जानेवारीच्या मुहूर्तावर जिल्ह्यात लसीकरण मोहिमेचा श्रीगणेशा करण्यात आला. बुलडाणा जिल्हा रुग्णालय, खामगाव, शेगाव, मलकापूर उप जिल्हा रुग्णालय तर देऊळगाव राजा, चिखली येथील ग्रामीण रुग्णालय या ६ केंद्रांत मोहीम राबविण्यात येत आहे. प्रत्येक केंद्राला १०० लस देण्याचे टार्गेट देण्यात आले.  पहिल्याच दिवशी एकूण ६०० लक्ष्यच्या तुलनेत ५७५ लस देऊन जिल्ह्याने राज्यात ३ ऱ्या क्रमांकपर्यंत मजल मारीत धमाकेदार सुरुवात केली. मात्र नाव नोंदणीसाठी असलेल्या कोविन ॲपमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने बोहणीलाच जिल्ह्यातील मोहिमेला नजर लागली! नजर काढेपर्यंत २ दिवस वाया गेले. यानंतर सोमवारी नव्याने नियोजन करून आज १९ जानेवारीपासून पुन्हा मोहीम सुरू करण्यात आली. आता आठवड्यातून ४ दिवस ही मोहीम राबविण्यात येणार असून यातही १ दिवसाचा ब्रेक राहणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण सोपान कांबळे यांनी सांगितले. आज मंगळवार व उद्या बुधवारी लसीकरण करून गुरुवारी ते बंद ठेऊन पुन्हा शुक्रवार व शनिवारी लसीकरण करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
लसीकरण जोमात
दरम्यान ब्रेक मिळाला असला तरी त्याचा लसीकरणावर फारसा परिणाम झाला नसल्याचे सुखद चित्र आहे. आज जिल्ह्यात ३५९  हेल्थ वर्कर्सना लस देण्यात आली आहे. यात देऊळगावराजात ६९,  शेगावात प्रत्येकी ८३,,  खामगावात ६३, चिखलीत ६५, मलकापुरात ५२,  तर बुलडाण्यात २७ शासकीय व खासगी आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस देण्यात आल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.