आता तयारी प्रत्यक्ष लसीकरणाची… 10 केंद्रांवर 13 हजारांवर आरोग्य कर्मचार्‍यांना देणार लस!

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोना लसीकरणाची ड्राय रन यशस्वी ठरल्याने आत्मविश्वास बळावलेल्या आरोग्य यंत्रणा आता 16 जानेवारीला आयोजित प्रत्यक्ष लसीकरणासाठी सज्ज व सिद्ध झाल्या आहेत. यासाठी 10 केंद्र राहणार असून, पहिल्या टप्प्यात 13 हजार 900 शासकीय व खासगी आरोग्य कर्मचार्यांना ही लस देण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या वरिष्ठ सूत्रांनी बुलडाणा लाईव्हशी …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोना लसीकरणाची ड्राय रन यशस्वी ठरल्याने आत्मविश्‍वास बळावलेल्या आरोग्य यंत्रणा आता 16 जानेवारीला आयोजित प्रत्यक्ष लसीकरणासाठी सज्ज व सिद्ध झाल्या आहेत. यासाठी 10 केंद्र राहणार असून, पहिल्या टप्प्यात 13 हजार 900 शासकीय व खासगी आरोग्य कर्मचार्‍यांना ही लस देण्यात येणार आहे.

जिल्हा प्रशासनाच्या वरिष्ठ सूत्रांनी बुलडाणा लाईव्हशी बोलताना ही महत्त्वपूर्ण माहिती दिली. शनिवारच्या मुहूर्तावर आयोजित ही महामोहीम सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेदरम्यान पार पडणार आहे. या प्रत्यक्ष लसीकरणासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली 7 तर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. ऋषिकेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली 3 केंद्रांवर ही मोहीम राबविण्यात येईल. यासाठी नोंदणी शासकीय व खासगी रुग्णालय आस्थापनातील जवळपास 14 हजार आरोग्य कर्मचार्‍यांना कोरोना प्रतिबंधासाठी तयार करण्यात आलेली लस देण्यात येणार आहे. यामध्ये डॉक्टर, आरोग्यसेवक, परिचारिका यांच्यासह खासगी रुग्णालयातील कर्मचार्‍यांचा समावेश असल्याचे या उच्चपदस्थ सूत्रांनी स्पष्ट केले.

2 हजार लस

पहिल्या टप्प्यातील या वॅक्सिन रनसाठी जिल्ह्याला 2 हजार लसचा कोटा मंजूर झाला आहे. या लस लवकरच प्राप्त होणार आहेत. मात्र जिल्ह्याला कोविशिल्ड की कोवक्सिन यापैकी कोणती लस मिळणार हे अद्याप निश्‍चित नाही. यापूर्वी 8 जानेवारीला 4 केंद्रावर पार पडलेली ड्राय रन कमालीची यशस्वी ठरली होती. यामुळे आरोग्य यंत्रणामधील धाकधूक व दबाव कमी झाला आहे. लसीकरण बद्दलचा आत्मविश्‍वास वाढल्याचे सुखद चित्र आहे.