आता माझे काही खरे नाही म्हणून कोविड सेंटरमध्येच साडीने घेतला गळफास

बार्शी येथील घटना बार्शी : आपल्यापाठोपाठ आपले कुटुंबीयदेखील कोरोनाबाधित आढळल्याने तणावात आलेल्या ३७ वर्षीय व्यक्तीने ’आता माझे काही खरे नाही. मी आता जगत नाही,’ असे म्हणत कोविड सेंटरमध्ये साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केलची घटना बार्शी (जि.सोलापूर) येथे घडली आहे.पोलीस सूत्रांनी सांगितले की, बार्शी येथील पाॅलिटेक्निक कॉलेजमध्ये कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे.त्यात शहर व …
 

बार्शी येथील घटना

बार्शी : आपल्यापाठोपाठ आपले कुटुंबीयदेखील कोरोनाबाधित आढळल्याने तणावात आलेल्या ३७ वर्षीय व्‍यक्‍तीने ’आता माझे काही खरे नाही. मी आता जगत नाही,’ असे म्हणत कोविड सेंटरमध्ये साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केलची घटना बार्शी (जि.सोलापूर) येथे घडली आहे.
पोलीस सूत्रांनी सांगितले की, बार्शी येथील पाॅलिटेक्निक कॉलेजमध्ये कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे.त्यात शहर व तालुक्यातील अनेक रुग्ण उपचार घेत आहेत. तालुक्यातील चिखर्डे गावातील उमेश भागवत कोंडारे (३७) हा इसम कोरोनाबाधित आल्याने उपचार घेत होता.उमेशने सुरुवातीला चार दिवस घरीच उपचार घेतले.त्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने कोविड सेंटरमध्ये भरती करण्यात आलेत्यानंतर त्याची आई- आणि पत्नी व दोन मुलेही कोरोनाबाधित आले. त्यामुळे तो अस्वस्थ झाला होता. कालपासून तो कुटुंबीयांना आता माझे काही खरे नाही. मी काही जगत नाही. मला टेन्शन आले आहे, असे म्हणत होता.त्यातून त्याने मंगळवारी पहाटे कोरोना सेंटरच्या बाथरूमजवळ साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांचा जबाबा नोंदवून घेतला आहे.