आता सदाभाऊही पेटले… दुधाला एस.एम.पी. जाहीर करण्याच्या मागणीसाठी 10 जूनला राज्यभर चाबूक फोड आंदोलन करणार!

पुणे (पुणे लाइव्ह वृत्तसेवा) ः मराठा आरक्षणासाठी राज्यावर आंदोलनाचे ढग असताना आणि त्यामुळे राज्य सरकारची चिंता वाढली असतानाच आणखी एका आंदोलनाची घोषणा झाली आहे. दुधाला एस.एम.पी. जाहीर करण्याच्या मागणीसाठी 10 जूनला रयत क्रांती संघटनेतर्फे राज्य सरकारविरोधात राज्यभर चाबूक फोड आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषदेत दिली. दोन वर्षांपासून पशुपालन आणि …
 

पुणे (पुणे लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मराठा आरक्षणासाठी राज्‍यावर आंदोलनाचे ढग असताना आणि त्‍यामुळे राज्‍य सरकारची चिंता वाढली असतानाच आणखी एका आंदोलनाची घोषणा झाली आहे. दुधाला एस.एम.पी. जाहीर करण्याच्या मागणीसाठी 10 जूनला रयत क्रांती संघटनेतर्फे राज्य सरकारविरोधात राज्यभर चाबूक फोड आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दोन वर्षांपासून पशुपालन आणि दूध उत्पादनाचा खर्च वाढत चालला असून, पशुधन सांभाळणे तारेवरची कसरत ठरत आहे. खासगी दूध संघाकडून उत्पादकांची पिळवणूक केली जाते. यावर दुग्ध व पशुसंवर्धन विभाग नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरला आहे. दुग्ध व पशुसंवर्धन खाते बिनकामाचे असल्यामुळे ते बंद करावे, अशी मागणीही खोत यांनी केली आहे. दुधाला किमान हमीभाव मिळाला पाहिजे. ऊसाप्रमाणे दुधाला एस.एम.पी. मिळावी. सरकार दूध उत्पादक शेतकर्‍यांकडे गांभीर्याने पाहायला तयार नाही, असा आरोपही त्‍यांनी केला.
वर्षानुवर्षे आषाढी वारी चालते. यंदा प्रत्येक पालखीसोबत जाण्यासाठी किमान ५० लोकांना परवानगी द्यावी. सोबत डॉक्टरांचे पथक देण्यात यावे. गरज वाटल्यास वारकर्‍यांसोबत आम्ही जाऊ. त्यांना संरक्षण देवू, असे खोत म्‍हणाले.