आत्मघाताची दुर्दैवी मालिका… जिल्ह्यात सहा महिन्यांत १३४ शेतकऱ्यांची आत्‍महत्‍या!

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेतकरी आत्मघाताची दुर्दैवी मालिका यंदाही कायम आहे. जेमतेम सहा महिन्यांतच जिल्ह्यात तब्बल १३४ कास्तकारांनी आत्महत्या करून समस्या व जीवनाचा अंत करून घेतलाय! शेतकऱ्यांना पोराप्रमाणे जपणाऱ्या जिजाऊंच्या माहेरात १ जानेवारी ते ३० जून या कालावधीत महिन्याकाठी २२ च्या सरासरीने आत्महत्या झाल्याची नोंद आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर म्हणजे जून …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः शेतकरी आत्मघाताची दुर्दैवी मालिका यंदाही कायम आहे. जेमतेम सहा महिन्यांतच जिल्ह्यात तब्बल १३४ कास्तकारांनी आत्महत्या करून समस्या व जीवनाचा अंत करून घेतलाय! शेतकऱ्यांना पोराप्रमाणे जपणाऱ्या जिजाऊंच्या माहेरात १ जानेवारी ते ३० जून या कालावधीत महिन्याकाठी २२ च्या सरासरीने आत्महत्या झाल्याची नोंद आहे.

खरीप हंगामाच्या तोंडावर म्हणजे जून महिन्यात तब्बल २३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. जानेवारी मध्ये हाच आकडा होता. फेब्रुवारीमध्ये १४, एप्रिल व मे महिन्यात प्रत्येकी १९ जणांनी टोकाचे पाऊल उचलले. मार्च महिन्यात सर्वाधिक म्हणजे ३० शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली. कोरोना बळींनी कळस गाठला असल्याने व सर्व फोकस त्याच्यावर असल्याने या आत्महत्या दुर्लक्षित ठरल्या!

४३ कुटुंबांना नाकारली मदत!
दरम्यान, आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मिळणारी तुटपुंजी मदत देतानाही यंत्रणांनी हात आखडता घेेणे हा या शोकांतिकेचा कळस ठरावा! कौटुंबिक वाद, व्यसनाधीनता या नावाखाली ही मदत नाकारण्यात आली. केवळ ८ जणांना मदत मिळाली असून, तब्बल ८३ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित असल्याचे धक्कादायक वृत्त आहे.