आदर्श शाळेच्‍या शिक्षकाची मोटारसायकल गेली चोरीला; चिखलीतील प्रकार

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत मोटारसायकल चोरीच्या घटना वाढल्या आहेत. काल, २२ जुलैला आणखी एक मोटारसायकल चिखलीतून चोरीला गेली. आदर्श मराठी शाळेच्या शिक्षकांची ही मोटारसायकल होती. संभाजीनगरात पहाटे हा प्रकार समोर आला. या प्रकरणी चिखली पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.शिक्षक सागर शंकर भालेराव (२९) यांनी काल, २३ जुलैला तक्रार दिली आहे. …
 
आदर्श शाळेच्‍या शिक्षकाची मोटारसायकल गेली चोरीला; चिखलीतील प्रकार

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत मोटारसायकल चोरीच्‍या घटना वाढल्‍या आहेत. काल, २२ जुलैला आणखी एक मोटारसायकल चिखलीतून चोरीला गेली. आदर्श मराठी शाळेच्या शिक्षकांची ही मोटारसायकल होती. संभाजीनगरात पहाटे हा प्रकार समोर आला. या प्रकरणी चिखली पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.
शिक्षक सागर शंकर भालेराव (२९) यांनी काल, २३ जुलैला तक्रार दिली आहे. २१ जुलैला त्‍यांची मोटरसायकल हिरो एचएफ डिलक्स (MH 28 BD1841) त्‍यांनी मित्र दिलीप आढे यांना चालवण्यासाठी दिली होती. रात्री अकराला आढे यांनी मोटारसायकल परत आणून घरासमोर उभी केली व चाबी वडील शंकर भालेराव यांच्‍याकडे दिली. पहाटे वडील झोपेतून उठल्यानंतर त्‍यांनी घराबाहेर येऊन पाहिले असता मोटारसायकल गायब दिसली. मेहकर फाटा, बुलडाणा रोड, जाफराबाद रोड भागात शोध घेतला. मात्र मोटारसायकल मिळून आली नाही, असे तक्रारीत म्‍हटले आहे.