आबालवृद्धांचा मतदान करताना उत्साह; 80 वर्षीय आजीबाई म्हणते आमच झालं गेलं पार पडलं आता लेकराबाळांच्या भविष्यासाठी मतदान!

बुलडाणा (कृष्णा सपकाळ : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातल्या 498 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होत आहे. सकाळी 7:30 वाजेपासून ग्रामीण भागातील मतदारांनी मतदान केंद्राबाहेर रांगा लावल्याचे दिसून आले. शेळगाव आटोळ (ता. चिखली) येथील मतदान केंद्रावर बुलडाणा लाइव्हने प्रातिनिधीक स्वरुपात पाहणी केली असता मतदारांचा उत्साह दिसून आला. मतदान केंद्रावर मतदारांना आणण्यासाठी उमेदवारांनी स्पेशल वाहनांची व्यवस्था केल्याचे दिसून …
 

बुलडाणा (कृष्णा सपकाळ : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातल्या 498 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होत आहे. सकाळी 7:30 वाजेपासून ग्रामीण भागातील मतदारांनी मतदान केंद्राबाहेर रांगा लावल्याचे दिसून आले. शेळगाव आटोळ (ता. चिखली) येथील मतदान केंद्रावर बुलडाणा लाइव्हने प्रातिनिधीक स्वरुपात पाहणी केली असता मतदारांचा उत्साह दिसून आला.

मतदान केंद्रावर मतदारांना आणण्यासाठी उमेदवारांनी स्पेशल वाहनांची व्यवस्था केल्याचे दिसून आले. वृद्ध मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी उमेदवारांनी कार्यकर्त्यांचे नियोजन केल्याचे दिसून आले. ग्रामपंचायतीच्या या निवडणुकीत पहिल्यांदा मतदान करणार्‍या युवकांचाही मोठा उत्साह दिसून येत आहे. 80 वर्षीय आजीबाई म्हणते… मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आलेल्या 80 वर्षीय आजीबाईंना मतदानाबद्दल प्रतिक्रिया विचारली असता, आमचं झालं गेलं पार पडलं. आता लेकरांच्या भविष्यासाठी मतदान करत असल्याचे त्या म्हणाल्या. सकाळपासुन प्रचंड उत्साहात मतदान होत असलेल्या शेळगाव आटोळ येथील केंद्रावर दुपारी 12 पर्यंत 45 टक्के मतदान झाले.