आमखेडमध्ये कोरोनाने घेतला बळी; दिवसभरात 44 नवे पॉझिटिव्ह रुग्ण

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 17 जानेवारीला कोरोनाने आणखी एक बळी घेतला. आमखेड (ता. चिखली) येथील 65 वर्षीय पुरुष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दिवसभरात 44 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 328 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 284 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 17 जानेवारीला कोरोनाने आणखी एक बळी घेतला. आमखेड (ता. चिखली) येथील 65 वर्षीय पुरुष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दिवसभरात 44 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 328 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 284 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 44 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 43 व रॅपीड टेस्टमधील एका अहवालाचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 202 तर रॅपिड टेस्टमधील 82 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्ह आलेले अहवाल

बुलडाणा शहर :3, बुलडाणा तालुका : कोलवड 1, चिखली शहर :1, चिखली तालुका : पेनसावंगी 1, मोताळा तालुका : तरोडा 1, लिहा 2, कोथळी 1, किन्होळा 1, मोताळा शहर : 5, शेगाव शहर : 11, शेगाव तालुका : पळशी 1, मानेगाव 1, गव्हाण 1, जानोरी 1, नांदुरा शहर :1, मलकापूर शहर :2, मलकापूर तालुका : जांबुळधाबा 1, संग्रामपूर तालुका : काकन वाडा 1, जळगाव जामोद तालुका : मालखेड 2, जळगाव जामोद शहर : 4, सिंदखेड राजा शहर :2

55 रुग्णांची कोरोनावर मात

आज 55 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. कोविड केअर सेंटरनुसार सुटी देण्यात आलेले रुग्ण असे ः देऊळगाव राजा : 4, खामगाव : 12, बुलडाणा : अपंग विद्यालय 15, स्त्री रुग्णालय 1, शेगाव : 10, सिंदखेड राजा: 4, जळगाव जामोद :1, नांदुरा :2, चिखली :6.

339 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू

आजपर्यंत 96990 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 12813 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. तसेच 596 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 13311 कोरोनाबाधित रुग्ण असून, जिल्ह्यात सध्या रुग्णालयात 339 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 159 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली आहे.