आमच्यासोबत संबंध ठेव नाही तर फोटो व्‍हायरल करू; २७ वर्षीय विवाहितेच्‍या घुसले घरात, दोन तरुणांविरुद्ध गुन्‍हा दाखल, खामगाव तालुक्‍यातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आमच्यासोबत संबंध ठेव नाही तर फोटो व्हायरल करू, अशी धमकी २७ वर्षीय विवाहितेला देऊन तिच्याशी अंगलट करणाऱ्या दोन तरुणांविरुद्ध खामगाव ग्रामीण पोलिसांनी आज, १६ ऑगस्टला गुन्हा दाखल केला आहे. ही घटना कारेगाव बुद्रूक (ता. खामगाव) येथे समोर आली असून, दोन्ही संशयित तरुण सध्या पुण्याला निघून गेल्याचे सूत्रांनी सांगितले. विपीन गजानन …
 
आमच्यासोबत संबंध ठेव नाही तर फोटो व्‍हायरल करू; २७ वर्षीय विवाहितेच्‍या घुसले घरात, दोन तरुणांविरुद्ध गुन्‍हा दाखल, खामगाव तालुक्‍यातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आमच्यासोबत संबंध ठेव नाही तर फोटो व्‍हायरल करू, अशी धमकी २७ वर्षीय विवाहितेला देऊन तिच्‍याशी अंगलट करणाऱ्या दोन तरुणांविरुद्ध खामगाव ग्रामीण पोलिसांनी आज, १६ ऑगस्‍टला गुन्‍हा दाखल केला आहे. ही घटना कारेगाव बुद्रूक (ता. खामगाव) येथे समोर आली असून, दोन्‍ही संशयित तरुण सध्या पुण्याला निघून गेल्याचे सूत्रांनी सांगितले.

विपीन गजानन उगले, ज्ञानेश्वर रमेश चिकटे (दोघे रा. कारेगाव बुद्रूक) अशी या तरुणांची नावे आहेत. पीडितेने तक्रारीत म्‍हटले आहे, की एक वर्षाअगोदर गणेशोत्‍सवाच्‍या काळात तिला तिच्‍या पतीच्‍या मोबाइलवर विपीन आणि ज्ञानेश्वर यांनी फोन केला. मुलाला मारण्याची धमकी देऊन आमच्‍यासोबत संबंध ठेव अन्यथा तुझे फोटो इंटरनेटवर व्‍हायरल करून बदनामी करू, अशी धमकी त्‍यांनी दिली. तेवढ्यावरच न थांबता त्‍यांनी वाईट उद्देशाने तिच्‍या घरात येऊन अंगलगट केली. ही बाब तिच्‍या पतीला कळल्‍याने त्‍याने तिला माहेरी नेऊन सोडले आहे. बदनामीच्‍या भीतीने तिने त्‍या तरुणांविरुद्ध तक्रारही दिली नव्‍हती. पण तरुणांच्‍या वाईट उद्देशामुळे संसार धोक्‍यात आल्याने तिने धाडस करून अखेर आज, १६ ऑगस्‍टला पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दिली. पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. तपास एएसआय आनंदा वाघमारे करत आहेत.