आमदार रायमूलकर यांच्या वाहनाला अपघात; मुलासह पाच जण जखमी

मेहकर (विष्णू आखरे पाटील : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : मेहकरचे शिवसेना आमदार तथा पंचायत राज समिती अध्यक्ष संजय रायमूलकर यांच्या इनोव्हा कारचा मध्यरात्री १२ च्या दरम्यान जालना येथे अपघात झाला. यात त्यांच्या मुलासह पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत. आ. रायमूलकर यांचा मुलगा निरज व त्याचे मित्र ९ जानेवारीला संभाजीनगरला (औरंगाबाद) गेले होते. परतताना जालना …
 

मेहकर (विष्णू आखरे पाटील : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : मेहकरचे शिवसेना आमदार तथा पंचायत राज समिती अध्यक्ष संजय रायमूलकर यांच्या इनोव्हा कारचा मध्यरात्री १२ च्या दरम्यान जालना येथे अपघात झाला. यात त्यांच्या मुलासह पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत.

आ. रायमूलकर यांचा मुलगा निरज व त्याचे मित्र ९ जानेवारीला संभाजीनगरला (औरंगाबाद) गेले होते. परतताना जालना शहरातील कन्हैय्यानगर ते बीड बायपासवर कारचे (क्रमांक एमएच २८ बीके २७७७) टायर फुटून कारनेे रस्त्याच्या खाली ३ ते ४ पलट्या घेत सरळ झाली. यात निरज संजय रायमूलकर, वरद ठाकूर, ऋषी पागोरे, प्रतिक इंगळे व सुनील पंडारे किरकोळ जखमी झाले. निरज रायमूलकर हे स्वत: वाहन चालवत असल्याचे समजते.