आमदार श्वेताताई महाले यांचे आवाहन… घरोघरी गोठे योजनेचा लाभ घ्यावा!

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ज्या शेतकऱ्यांकडे गुरे-ढोरे, शेळी, तथा कुक्कुट पालनाचा व्यवसाय आहे आणि शेतामध्ये जनावरांना गोठे नाहीत अशांसाठी घरोघरी गोठे ही योजना राबवण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्याच्या दृष्टीने १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभेत किंवा किंवा कोणत्याही मासिक सभेत गोठ्यांचा लाभ मिळण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन आमदार श्वेताताई …
 
आमदार श्वेताताई महाले यांचे आवाहन… घरोघरी गोठे योजनेचा लाभ घ्यावा!

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ज्या शेतकऱ्यांकडे गुरे-ढोरे, शेळी, तथा कुक्कुट पालनाचा व्यवसाय आहे आणि शेतामध्ये जनावरांना गोठे नाहीत अशांसाठी घरोघरी गोठे ही योजना राबवण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्याच्या दृष्टीने १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभेत किंवा किंवा कोणत्याही मासिक सभेत गोठ्यांचा लाभ मिळण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन आमदार श्वेताताई महाले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

११ ऑगस्टला दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, ग्रामसमृद्धी योजना जनावरे, शेळीपालक व कुक्कुटपालनासाठी शेड बांधकामाला अनुदान देणार आहे. योजनेत २ ते ६ जनावरे, स्वतःची जमीन व जागा असणाऱ्या पशुपालकांसाठी ७७,००० रुपये, १२ जनावरे असणाऱ्यांसाठी दुप्पट व जास्तीत जास्त १८ जनावरे असणारांसाठी तिप्पट अनुदान दिले जाणार आहे. शेळी पालकांसाठी ४९,००० रुपये व कुक्कुट पालकांसाठी ४९,००० रुपये अनुदान अनुज्ञेय राहणार आहे. योजनेअंतर्गत कुशल व अकुशल मजुरीचे नियमानुसार प्रमाण राखण्यासाठी लाभार्थ्याला वैयक्‍तिक जमिनीवर वृक्षलागवड, शोषखड्डे, कंपोस्‍ट बंडिंग, आदी मजुरीप्रधान कामे घ्यावी लागणार आहेत. जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या गावातील ग्रा.पं. कडे अर्ज करावेत व ग्रामसभेस उपस्थित राहून कृती आराखड्यामध्ये नावे समाविष्ट करावे, असे आवाहन आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी केले आहे.

योजनेसाठी ही कागदपत्रे आवश्यक
योजनेसाठी ग्रामपंचायत ठराव, सातबारा, ८-अ, यापूर्वी कोणत्याही योजनेतून लाभ न घेतल्याचा दाखला (ग्रामपंचायतीचा), जनावरे असल्याबाबत (पशुधन विकास अधिकारी) LDO यांचे प्रमाणपत्र, लाभार्थी अल्पभूधारक असणे आवश्यक, जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड, जागेचा फोटो, जॉबकार्ड या कागदपत्रांची आवश्यकता आहे.