आमदार श्‍वेताताई महाले यांच्या तारांकित प्रश्‍नावर खामगाव- जालना रेल्वेमार्गाची बैठक; कामाला मिळणार गती

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तब्बल 110 वर्षांपासून प्रलंबित असलेला खामगाव- जालना रेल्वेमार्गाचा विषय जिल्ह्याच्या आस्थेचा मुद्दा आहे. अनेकदा सर्वेक्षण होऊनही या रस्त्याचे काम सुरू झाले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2016 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात खामगाव- जालना रस्त्याच्या सर्वेक्षणासाठी मान्यता देऊन 3000 कोटी रुपयांची तरतूदही केल्याने हा रेल्वे मार्ग होण्याच्या जिल्हावासीयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. …
 

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तब्बल 110 वर्षांपासून प्रलंबित असलेला खामगाव- जालना रेल्वेमार्गाचा विषय जिल्ह्याच्या आस्थेचा मुद्दा आहे. अनेकदा सर्वेक्षण होऊनही या रस्त्याचे काम सुरू झाले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2016 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात खामगाव- जालना रस्त्याच्या सर्वेक्षणासाठी मान्यता देऊन 3000 कोटी रुपयांची तरतूदही केल्याने हा रेल्वे मार्ग होण्याच्या जिल्हावासीयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम तातडीने पूर्ण करून अंदाजपत्रक पत्रके सादर करण्याची मागणी आमदार सौ. श्‍वेताताई महाले यांनी केली होती. त्यावर अंदाजपत्रके बनविण्यासाठी गती वाढविण्याचे आदेश परिवहनमंत्री अनिल परब यांनी सौ. श्‍वेताताई महाले यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्‍नाला उत्तर देताना दिलेल्या आश्‍वासनांचा अनुषंगाने झालेल्या बैठकीत दिले.
या संदर्भात विधानसभेत तारांकित प्रश्‍न उपस्थित करून खामगाव – जालना रेल्वेमार्गाच्या विषयाला आमदार श्‍वेताताई महाले यांनी पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या सभागृहात वाचा फोडली होती. त्यावर त्यांच्या प्रश्‍नाच्या उत्तरात या रेल्वेमार्गात येणार्‍या अडचणी दूर करून रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण करण्यासाठी रेल्वे विभागासोबत बैठक घेण्याची ग्वाही परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली होती. त्या अनुषंगाने आज, 9 फेब्रुवारी रोजी परब यांच्या अध्यक्षतेखाली आणि रेल्वेच्या उच्चस्तरीय अधिकार्‍यांसमवेत बैठक घेण्यात आली आहे. बैठकीला अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी तथा विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांचे खासगी सचिव विद्याधर महाले, सुधीर पटेल मुख्य अभियंता, सुरेश जैन उपमुख्य परिचलन प्रबंधक सर्वेक्षण मुख्यालय मुंबई आणि परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. खामगाव- जालना रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी तांत्रिक टीम बुलडाणा व जालना येथे येऊन पाहणी करून गेली. नेहमीप्रमाणे सर्वे कागदावर न राहता प्रत्यक्षात सकारात्मक असला पाहिजे जेणेकरून खामगाव जालना रेल्वे मार्गाची जिल्हा वासीयांचे रेल्वेचे स्वप्न पूर्ण व्हावे. याकरिता या रेल्वे मार्गातील अडचणी दूर करण्याची तसेच सर्वे लवकरात लवकर पूर्ण करून अंदाजपत्रके सादर करण्याचा आग्रह आमदार सौ. श्‍वेताताई महाले पाटील यांनी धरला आहे.