आमदार संजय कुटे यांची मागणी ः पंतप्रधानांनी खत दरवाढ थांबवली, आता तुम्‍ही खरीप तयारीसाठी 10 हजार अनुदान द्या!

जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा, मो. 9822988820) ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तब्बल 14 हजार 775 कोटी रुपयांचे अनुदान देऊन खत दरवाढीला लगाम लावला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता राज्य सरकारने खत शेतकऱ्यांना सहज उपलब्ध होईल याची व्यवस्था करून शेतकऱ्यांना खरीप हंगामातील मशागतीसाठी 10 हजार रुपयांचे सरसकट अनुदान रोख स्वरुपात द्यावे, अशी …
 

जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा, मो. 9822988820)  ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तब्‍बल 14 हजार 775 कोटी रुपयांचे अनुदान देऊन खत दरवाढीला लगाम लावला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता राज्‍य सरकारने खत शेतकऱ्यांना सहज उपलब्‍ध होईल याची व्‍यवस्‍था करून शेतकऱ्यांना खरीप हंगामातील मशागतीसाठी 10 हजार रुपयांचे सरसकट अनुदान रोख स्‍वरुपात द्यावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार डॉ. संजय कुटे यांनी केली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठांत खतातील घटकांच्‍या किंमती वाढल्‍याने कंपन्यांनी खताची दरवाढ केली होती. याचा फटका शेतकऱ्यांना बसणार असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्‍यावर उपाययोजना सुरू केल्या होत्‍या. हे लक्षात घेऊन विरोधकांनी दरवाढ मागे घेण्याची मागणी केली. पण ठरल्या प्रमाणे केंद्र सरकारने अनुदानाचा निर्णय घेऊन विरोधकांना गप्प केले. आता राज्‍य सरकारने खरीप तयारीसाठी शेतकऱ्यांना 10 हजारांचे अनुदान द्यावे व गरजू शेतकऱ्यांना खत सहज उपलब्‍ध करून द्यावे, असे आमदार डॉ. कुटे यांनी म्‍हटले आहे. गेल्या वर्षी खताच्‍या कृत्रिम टंचाईने शेतकऱ्यांना मोठा त्रास झाला होता. यावेळी तसे होऊ देऊ नये, असेही डॉ. कुटे यांनी निवेदनातून म्‍हटले आहे.