आमदार गायकवाडांची कार जाळणाऱ्यांच्‍या शोधासाठी 6 पथके; अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्‍हा दाखल

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा, मो. 9822988820) ः बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा, मो. 9822988820) ः आज, 26 मे रोजी पहाटे आमदार संजय गायकवाड यांची इनोव्हा कार जाळण्यात आल्या प्रकरणी बुलडाणा शहर पोलिसांनी तपासाला वेग दिला असून, 6 पथके यासाठी नियुक्त केली आहेत. कुणाल संजय गायकवाड यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा, मो. 9822988820) ः बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा, मो. 9822988820) ः  आज, 26 मे रोजी पहाटे आमदार संजय गायकवाड यांची इनोव्‍हा कार जाळण्यात आल्या प्रकरणी बुलडाणा शहर पोलिसांनी तपासाला वेग दिला असून, 6 पथके यासाठी नियुक्‍त केली आहेत. कुणाल संजय गायकवाड यांच्‍या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती ठाणेदार प्रदीप साळुंके यांनी दिली.

सूत्रांच्‍या माहितीनुसार, आमदार गायकवाड मध्यरात्री दीडला मुंबईवरून परतले होते. पहाटे साडेतीनच्‍या सुमारास मोठा आवाज झाल्याने आमदारपूत्र कुणाल गायकवाड घरातून बाहेर आले असता त्यांना घरासमोर उभी कार (क्रमांक एमएच 28 बीजे 3132) पेटलेली दिसली. आमदार गायकवाड, श्रीकांत गायकवाड सुद्धा लगेच बाहेर आले. त्यांनी आग विझवली. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रदीप साळुंखे ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. यावेळी ठसेतज्‍ज्ञ व श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते. आमदार संजय गायकवाड यांनी 8 महिन्यांपूर्वीच ही कार खरेदी केल्याचे कळते. वृत्त लिहीपर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला नव्हता.

बुलडाणा स्‍थानिक गुन्‍हे शाखेचे पथक घटनेच्या चौकशीसाठी सकाळी आले होते. त्यांनी पाहणी करून तपास सुरू केला आहे. आमदार गायकवाड यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी संपर्क साधला असून, ही घटना जिल्हा पोलिस अधीक्षकांनी गंभीरतेने घेतली आहे.

हा पूर्वनियोजित कट;परिवाराशी काय खेटता ;समोरासमोर या : आमदार गायकवाड

मी मुंबईला गेल्याचे पाहूनच वाहन पेटवण्याचा हा पूर्वनियोजित कट होता. या गाडीशेजारी अन्य चार ते पाच वाहने उभी होती. 8 ते 10 मोटारसायकल होत्या. या सर्व व घर पेटवण्याचा त्यांचा उद्देश असावा. मी 1:30 वाजता मुंबईवरून परतलो, तेव्हा परिसरातील लाईट लागलेले होते. मात्र पेट्रोल टाकून वाहन पेटवून दिले तेव्हा लाईट बंद करण्यात आली  होती. यावरून हा पूर्वनियोजित कट असल्याचेच समोर येते. मी जे काम आमदार झाल्यावर रोखठोकपणे करतो. ते 50 वर्षांत कुणाला जमले नाही म्हणून काहींनी हा प्रकार केला असेल असे वाटते. माझ्या परिवाराशी काय खेटता समोरासमोर या, असे आव्हान आमदार गायकवाड यांनी बोलताना दिले.