आमदार सौ. श्वेताताई महाले संतप्‍त!; Buldana Live कडे व्‍यक्‍त केल्या भावना, केली “ही’ मागणी

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पुण्यानंतर आता साकीनाका मुंबईतील पीडितेने आज अखेरचा श्वास घेतला. तिच्यावर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने अगोदरच मन हेलावून टाकले होते आता ती निर्भया गेल्याने मन सुन्न झाले आहे. अंगावर शहारे आणणाऱ्या या हृदयद्रावक घटनेने जणू महिलांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केलेच. परंतु शासनाचे अस्तित्व आहे की नाही हा सुद्धा प्रश्न निर्माण झाला आहे. …
 
आमदार सौ. श्वेताताई महाले संतप्‍त!; Buldana Live कडे व्‍यक्‍त केल्या भावना, केली “ही’ मागणी

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पुण्यानंतर आता साकीनाका मुंबईतील पीडितेने आज अखेरचा श्वास घेतला. तिच्यावर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने अगोदरच मन हेलावून टाकले होते आता ती निर्भया गेल्याने मन सुन्न झाले आहे. अंगावर शहारे आणणाऱ्या या हृदयद्रावक घटनेने जणू महिलांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केलेच. परंतु शासनाचे अस्तित्व आहे की नाही हा सुद्धा प्रश्न निर्माण झाला आहे. जिजाऊ, सावित्री व रमाईच्या किती लेकींना या अत्याचाराचा सामना करावा लागणार? साकी नाका येथे घडलेली घटना अत्यंत पाशवी व क्रूर असल्याने जलदगती न्यायालयात हा खटला चालवून गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी संतप्त प्रतिक्रिया आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी व्‍यक्‍त केली आहे.

महिलांवरील होत असणारे अत्याचार व त्यात होत असणारी वाढ यामुळे राज्यात अत्याचार करणाऱ्या तालिबानीचे राज्य आहे की काय? असा सवाल आता उठत आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचे पार बोजवारा उडाला आहे. समाजात वावरणाऱ्या समाज धुरीणांनी देखील सामोरे येऊन अशा निर्घृण घटनांना आळा घालण्यासाठी ठोस पाऊल उचलणे गरजेचे आहे. फास्ट ट्रॅकमध्ये खटला चालवून नराधम गुन्हेगारांना मृत्यूदंडाची शिक्षा देऊन महिलांना संरक्षणाची हमी देण्याचं काम सरकारने करावे, अशी मागणीही त्‍यांनी केली.