आमदार ॲड. फुंडकर यांनी सांगितले गायगावमध्ये त्‍या दिवशी नक्‍की काय घडले…

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः वीज बिल थकलेले नसतानाही महावितरण कर्मचाऱ्याने घरी येऊन दमदाटी केली. एवढेच नाही तर ग्राहकाच्या कानशिलात लगावली. त्यानंतर हाणामारी होऊन प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेले. ग्राहक गुलाबराव सोनोने यांच्या मुलाला अटक करण्यात आली. गायगाव बुद्रूक (ता. शेगाव) येथे महावितरण कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीचे सत्य खामगावचे आमदार ॲड. आकाश फुंडकर यांनी सांगितले असून, या …
 

शेगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)  ः वीज बिल थकलेले नसतानाही महावितरण कर्मचाऱ्याने घरी येऊन दमदाटी केली. एवढेच नाही तर ग्राहकाच्‍या कानशिलात लगावली. त्‍यानंतर हाणामारी होऊन प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेले. ग्राहक गुलाबराव सोनोने यांच्‍या मुलाला अटक करण्यात आली. गायगाव बुद्रूक (ता. शेगाव) येथे महावितरण कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीचे सत्‍य खामगावचे आमदार ॲड. आकाश फुंडकर यांनी सांगितले असून, या प्रकरणी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्‍यांनी महावितरणच्‍या मुख्य अभियंत्‍यांकडे केली आहे. घरातील महिलेला धमकावणे ही सर्वस्वी वीज कर्मचाऱ्यांची चूक असून, अशा प्रकारे पठाणी वसुली करणे अन्यायकारक असल्याचे आमदार फुंडकर यांनी म्‍हटले आहे.