आमिर खानचा सिनेमा प्रदर्शनापूर्वीच वादात

मुंबई : आमिर खानची ओळख मिस्टर परफेक्शनिष्ट अशी आहे. जलसंधारणाच्या कामामुळे तो जसा चर्चेत असतो, तसाच पत्नीशी घेतलेल्या घटस्फोटामुळेही तो सध्या चर्चेत आहे. त्याच्या ‘लाल सिंह चड्ढा’ या सिनेमाचे शूटिंग लडाखमध्ये सुरू असून, त्यावरून वाद सुरू झाला आहे. लडाखमध्ये ज्या भागात चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे, त्या भागातील नागरिकांचा तिथे शूटिंग करायला विरोध आहे. त्याचे कारण …
 

मुंबई : आमिर खानची ओळख मिस्टर परफेक्शनिष्ट अशी आहे. जलसंधारणाच्या कामामुळे तो जसा चर्चेत असतो, तसाच पत्नीशी घेतलेल्या घटस्फोटामुळेही तो सध्या चर्चेत आहे. त्याच्या ‘लाल सिंह चड्ढा’ या सिनेमाचे शूटिंग लडाखमध्ये सुरू असून, त्यावरून वाद सुरू झाला आहे.

लडाखमध्ये ज्या भागात चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे, त्या भागातील नागरिकांचा तिथे शूटिंग करायला विरोध आहे. त्याचे कारण लडाखमध्ये टीम आमिर प्रदूषण करीत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. रिलीजपूर्वीच या सिनेममुळे वाद सुरू झाला आहे. ‘सोशल मीडिया’वर एका युजरने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडिओत लडाखमधील वाखा गावातील दृश्य दिसतं. हा व्हिडिओ पाहून त्या परिसरात झालेलं प्रदूषण लक्षात येतं. गाड्यांमुळे झालेलं प्रदूषण, प्लास्टिकच्या बाटल्या, कचरा आणि इतर वस्तू सगळीकडे पसरलेल्या दिसत आहेत. “ही भेट बॉलिवूड स्टार आमिर खानचा येणारा सिनेमा ‘लाल सिंह चड्ढा’ कडून लडाखच्या वाखा ग्रामस्थांना. आमिर खान स्वत: ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमात प्रदूषणासंदर्भात मोठंमोठं वक्तव्य करतात; मात्र जेव्हा स्वत:ची वेळ असते तेव्हा हे असं असतं.” अशा शेलक्या शब्दांत आमिर खानवर टीका करण्यात आली आहे.