“आम्ही बुलडाणेकर’ची टीम Buldana Live कार्यालयात!; पूरग्रस्तांसाठी बुलडाणा लाइव्हनेही दिला खारीचा वाटा!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात यंदा अतिवृष्टीने अनेक परिवार उघड्यावर आले. अनेक गावे उद्ध्वस्त झालीत. या पूरग्रस्तांसाठी “आम्ही बुलडाणेकर’ या समूहातर्फे सध्या मदतनिधी उभारण्यात येत आहे. या टीमने आज, ११ ऑगस्टला बुलडाणा लाइव्ह कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी लाइव्ह ग्रुपचे समूह सल्लागार मनोज सांगळे यांनी या उपक्रमाचे कौतुक करून बुलडाणा लाइव्हकडूनही …
 
“आम्ही बुलडाणेकर’ची टीम Buldana Live कार्यालयात!; पूरग्रस्तांसाठी बुलडाणा लाइव्हनेही दिला खारीचा वाटा!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात यंदा अतिवृष्टीने अनेक परिवार उघड्यावर आले. अनेक गावे उद्‌ध्वस्त झालीत. या पूरग्रस्तांसाठी “आम्ही बुलडाणेकर’ या समूहातर्फे सध्या मदतनिधी उभारण्यात येत आहे. या टीमने आज, ११ ऑगस्‍टला बुलडाणा लाइव्ह कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.

यावेळी लाइव्ह ग्रुपचे समूह सल्लागार मनोज सांगळे यांनी या उपक्रमाचे कौतुक करून बुलडाणा लाइव्हकडूनही मदतनिधी धनादेशाच्‍या स्वरुपात सुपूर्द केला. कोकणातील महाड तालुक्यातील गावात ही मदत दिली जाणार आहे. जीवनाश्यक वस्तूंच्या ३०० किट गरजू परिवारांना दिल्या जाणार आहेत. किटमध्ये ब्लँकेट, चटई, ३ ताटे, २ लोटे, १ कढई, १ पळी, २ टॉवेल या साहित्याचा समावेश असणार आहे. यासाठी २ लाख ५१ हजार रुपयांची आवश्यकता असून, काल १० ऑगस्टपर्यंत २ लाख ६ हजार रुपयांचा मदतनिधी “आम्ही बुलडाणेकर’ने उभारला आहे. १५ ऑगस्ट रोजी साहित्याने भरलेला ट्रक महाडसाठी रवाना होणार असल्याची माहिती आम्ही बुलडाणेकर सदस्यांनी दिली.