आम्‍ही काय नुसते वयाने मोठे झालो का?; कॉलेज तरुणांचा बुलडाणा लाइव्हकडे “भाबडा’ प्रश्न!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गेल्या दीड वर्षापासून जिल्ह्यातील शाळ, महाविद्यालये बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. ते टाळण्यासाठी ऑनलाइन शिक्षण देण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र ग्रामीण भागात या ऑनलाइन शिक्षणाचा पार फज्जा उडाल्याचे चित्र आहे. गावात फोनवर बोलण्यासाठी रेंज नसते तिथे इंटरनेट कसे चालणार? अनेकदा मोबाइलला चार्जिंग नसते. कारण तो चार्ज करायला …
 
आम्‍ही काय नुसते वयाने मोठे झालो का?; कॉलेज तरुणांचा बुलडाणा लाइव्हकडे “भाबडा’ प्रश्न!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गेल्या दीड वर्षापासून जिल्ह्यातील शाळ, महाविद्यालये बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. ते टाळण्यासाठी ऑनलाइन शिक्षण देण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र ग्रामीण भागात या ऑनलाइन शिक्षणाचा पार फज्जा उडाल्याचे चित्र आहे. गावात फोनवर बोलण्यासाठी रेंज नसते तिथे इंटरनेट कसे चालणार? अनेकदा मोबाइलला चार्जिंग नसते. कारण तो चार्ज करायला कधीही बत्ती गूल असते… जिथे कोरोना रुग्ण नाहीत अशा गावांत वर्ग ८ ते १० वीचे वर्ग सुरू झाले आहेत. पहिली ते दहावी वर्ग सुरू करण्याच्या हालचाली प्रशासन व शिक्षण विभागाकडून सुरू आहेत. मात्र दीड वर्षापासून बंद असलेली महाविद्यालये सुरू करण्याबाबत मात्र कोणत्याही हालचाली दिसत नाहीत. त्‍यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांत चिंता व्‍यक्‍त होत आहे. शाळकरी मुले नियमांचे पालन करू शकतात, मग आम्‍ही काय नुसते वयानेच मोठे झालो का? आम्‍हाला नियमांचे पालन करणे जमणार नाही का? असे प्रश्न त्‍यांनी बुलडाणा लाइव्हला केले आहेत. नियमांचे पालन करण्याची अट ठेवून महाविद्यालये सुरू करण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी या विद्यार्थ्यांमधून समोर येत आहे.

बुलडाणा जिल्ह्यात महाविद्यालयांची संख्या ९५ असून, पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ४८४५२ इतकी आहे. याशिवाय कोरोनामुळे १२ व्या वर्गात भरघोस गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा मोठी आहे. १२ वी उत्तीर्ण विद्यार्थी सुद्धा प्रवेशाबाबत संभ्रमावस्थेत आहेत.

कॉलेजमध्ये विद्यार्थी नसतील तर शिक्षकांनाही करमत नाही. प्रत्यक्ष वर्गात शिकविणे आणि “व्हर्च्युअल’ शिकविणे यात मोठी तफावत आहे. ऑनलाइन शिक्षणातून विद्यार्थी आणि शिक्षकांना सुद्धा समाधान मिळत नाही. दीड वर्षापासून कॉलेज बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने नियमांचे पालन करून कॉलेज सुरू करण्याची परवानगी द्यावी. आम्ही त्यासाठी पूर्णपणे तयार आहोत.

-प्रा. डॉ. सुभाष गव्हाणे, प्राचार्य तात्यासाहेब महाजन कला व वाणिज्य महाविद्यालय, चिखली

ऑनलाइन शिक्षणातून विद्यार्थ्यांना शिकविताना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतो. विद्यार्थ्यांचा अडचणी समजून घेता येत नाहीत. याशिवाय कोविडमुळे ऑनलाइन परीक्षेतून १२ व्या वर्गात भरघोस गुण विद्यार्थ्यांनी मिळविले असले तरी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचे काय? त्यामुळे नियमांच्या अटी ठेवून प्रत्यक्ष विद्यार्थ्यांकरिता कॉलेज सुरू करण्याची परवानगी शासनाने द्यायला हवी.

-मिलिंद हिवाळे, प्राध्यापक

आंदोलने, मोर्चे, राजकीय सभा, निवडणुका घ्यायला सरकारची तयारी असते. मग कॉलेज सुरू करायला काय अडचण. कॉलेज लवकरात लवकर सुरू करायला हवीत.

-वैष्णवी सोळंकी, कॉलेज विद्यार्थिनी

शाळा सुरू करण्यासाठी सगळ्यांची धडपड दिसते. मात्र कॉलेज सुरू व्हावे असे का नाही वाटत? शालेय विद्यार्थ्यांपेक्षा कॉलेज तरुणांचा वयोगट मोठा असतो. ते समजदार असतात. मात्र तरीही आम्ही समजदार आहोत असे वाटत नाही का? आम्ही नियमांचे काटेकोर पालन करू. पण कॉलेजला परवानगी द्या.

-अमर शेळके, कॉलेज विद्यार्थी