आयपीएल सामन्यावर लावत होता सट्टा; खामगावमध्ये एकाची घरातून वरात

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या एकास खामगावमध्ये शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून 15 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. रेखा प्लॉट भागात ही कारवाई 21 एप्रिलला करण्यात आली. प्रकाश गोपीनाथ सोनी हा आपल्या घरूनच ऑनलाइन सट्टा खेळत होता. चेन्नई विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात काल सामना सुरू होता. या सामन्यावर …
 

खामगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)  ः आयपीएल क्रिकेट सामन्‍यावर सट्टा लावणाऱ्या एकास खामगावमध्ये शिवाजीनगर पोलिसांनी ताब्‍यात घेतले आहे. त्‍याच्‍याकडून 15 हजारांचा मुद्देमाल जप्‍त करण्यात आला. रेखा प्‍लॉट भागात ही कारवाई 21 एप्रिलला करण्यात आली.

प्रकाश गोपीनाथ सोनी हा आपल्या घरूनच ऑनलाइन सट्टा खेळत होता. चेन्‍नई विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्‍यात काल सामना सुरू होता. या सामन्यावर त्‍याने सट्टा लावला होता. त्‍याला अटक करून टीव्‍ही, मोबाइल, रोख 730 रुपये असा 15 हजार 530 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्‍त केला. त्‍याच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.