आयपीएल सामन्‍यावर ऑनलाइन सट्टा लावणारे 4 जण पकडले; चिखलीत ‘एलसीबी’ची कारवाई

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आयपीएल सामन्यावर ऑनलाइन सट्टा लावणाऱ्या चौघांवर बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) 10 एप्रिलला चिखली शहरात कारवाई केली. एलसीबीला गोपनीय माहिती मिळाली होती, संभाजीनगर येथील साहेबराव लावंड यांच्या राहत्या घरी आयपीएलमधील चेन्नई विरुद्ध दिल्ली या सामन्यावर ऑनलाइन सट्टा लावला जात आहे. पोलिसांनी तातडीने तिथे धाव घेऊन श्याम ज्ञानेश्वर कुसाळकर, अनिकेत दिलीप …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः आयपीएल सामन्यावर ऑनलाइन सट्टा लावणाऱ्या चौघांवर बुलडाणा स्‍थानिक गुन्‍हे शाखेने (एलसीबी) 10 एप्रिलला चिखली शहरात कारवाई केली.

एलसीबीला गोपनीय माहिती मिळाली होती, संभाजीनगर येथील साहेबराव लावंड यांच्‍या राहत्‍या घरी आयपीएलमधील चेन्‍नई विरुद्ध दिल्ली या सामन्यावर ऑनलाइन सट्टा लावला जात आहे. पोलिसांनी तातडीने तिथे धाव घेऊन श्याम ज्ञानेश्वर कुसाळकर, अनिकेत दिलीप इंगळे, स्वप्निल भगवान जाधव, प्रदीप विजय सोळंके (सर्व रा. चिखली, ता. चिखली) यांना ताब्‍यात घेतले. त्‍यांच्‍याकडून एक लॅपटॉप ,आठ मोबाईल फोन, तीन दुचाकी असा एकूण 2 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्‍त केला. चारही जणांविरुद्ध चिखली पोलीस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई कर्तव्‍यदक्ष पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्‍पर पोलीस अधीक्षक (बुलडाणा) बजरंग बनसोडे, अप्‍पर पोलीस अधीक्षक खामगाव हेमराजसिंह राजपूत यांच्‍या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांच्‍या आदेशाने एपीआय नागेश कुमार चतरकर, पीएसआय नीलेश शेळके, पीएसआय श्रीकांत जिंदमवर, नापोकाँ रघुनाथ जाधव, नापोकाँ दीपक पवार, नापोकाँ गजानन अहेर,  पोकाँ विजय सोनवणे, पोकाँ संभाजी असोलकर, पोकाँ पंकज मेहेर यांनी केली.