आयशरचालकाने गाडीतच केली आत्‍महत्‍या; दुसरबीड येथील धक्‍कादायक घटना

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चालकाने आयशर वाहनातच दारूच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना दुसरबीड (ता. सिंदखेड राजा) जवळ आज, 12 मे रोजी सकाळी 11 च्या सुमारास समोर आली. दुसरबीडपासून जवळच नगरमाळाच्यावर हिंदुस्तान पेट्रोलपंपाच्या जवळ हे वाहन डिझेल संपल्याने उभे होते. कौतिकराव संतोषराव डूनगहू (35, रा. शिराळा, ता. …
 

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः चालकाने आयशर वाहनातच दारूच्‍या नशेत गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. ही खळबळजनक घटना दुसरबीड (ता. सिंदखेड राजा) जवळ आज, 12 मे रोजी सकाळी 11 च्‍या सुमारास समोर आली.

दुसरबीडपासून जवळच नगरमाळाच्यावर हिंदुस्तान पेट्रोलपंपाच्‍या जवळ हे वाहन डिझेल संपल्याने उभे होते. कौतिकराव संतोषराव डूनगहू (35, रा. शिराळा, ता. जाफराबाद, जि.जालना) असे आत्‍महत्‍या केलेल्या चालकाचे नाव आहे. आयशरचे (क्रमांक MH 14 CP7062) मालक रवि मलवर यांनी आळंदीवरून 9 मे रोजी अमरावतीला हे वाहन पाठवले होते. परतताना वाहनातील डिझेल संपले म्‍हणून चालक थांबला. दारूच्या नशेत गाडीतच त्‍याने आत्महत्या केली. तपास ठाणेदार सोमनाथ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार अशोक चाटे, पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी बारगजे करत आहेत.