आरटीईसाठी जिल्ह्यात 2142 जागा; 3 मार्चपासून करा ऑनलाइन अर्ज

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमाअंतर्गत (आरटीई) जिल्ह्यातील 2475 शाळांपैकी पहिली ते आठवीपर्यंतच्या 231 शाळांत 2142 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. 3 मार्चपासून ऑनलाइन पद्धतीने या जागांवर प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे.पालकांनी www.rte25admission.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा परिषद शिक्षणाधिकाऱ्यांनी केले आहे. अर्ज करण्याची मुदत 21 मार्चपर्यंत …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बालकांचा मोफत व सक्‍तीच्‍या शिक्षणाचा अधिकार अधिनियमाअंतर्गत (आरटीई) जिल्ह्यातील 2475 शाळांपैकी पहिली ते आठवीपर्यंतच्‍या 231 शाळांत 2142 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. 3 मार्चपासून ऑनलाइन पद्धतीने या जागांवर प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे.
पालकांनी www.rte25admission.maharashtra.gov.in या संकेतस्‍थळावर अर्ज करावेत, असे आवाहन जिल्‍हा परिषद शिक्षणाधिकाऱ्यांनी केले आहे. अर्ज करण्याची मुदत 21 मार्चपर्यंत आहे. पालकांनी प्रवेश अर्ज भरताना सर्व कागदपत्रांची पूर्तता करावी, असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी केले आहे.

(बुलडाणा लाइव्‍हवर तुम्‍हाला बातमी द्यायचीय? ः कॉल कराः 9850877896)