आरटीओ अधिकारी महिलेचे घर फोडले; बुलडाणा शहरात चोरट्यांचे डोके वर; शेजाऱ्याचेही घर केले साफ

बुलडाणा (अजय राजगुरे : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : बुलडाणा शहरात चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. दोन घरे फोडून ५६ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना बुलडाणा शहरातील सरस्वतीनगरात १७ जानेवारीच्या मध्यरात्रीनंतर घडली आहे.उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री विजय दुतोंडे (४८, रा.सरस्वतीनगर) या घरी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी कुलूप तोडून घरामधील १२ हजार रुपये नगदी व ३ …
 

बुलडाणा (अजय राजगुरे : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : बुलडाणा शहरात चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. दोन घरे फोडून ५६ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना बुलडाणा शहरातील सरस्वतीनगरात १७ जानेवारीच्या मध्यरात्रीनंतर घडली आहे.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री विजय दुतोंडे (४८, रा.सरस्वतीनगर) या घरी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी कुलूप तोडून घरामधील १२ हजार रुपये नगदी व ३ ग्रॅम व ५ ग्रॅमची अंगठी किंमत अंदाजे १५ हजार रुपये असा एकूण २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
जयश्री दुतोंडे यांच्याच बाजूला राहणारे विनायक श्रीराम पाटील (६२) यांच्याही घरी कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरातील २३ हजार रुपये रोख रक्कम व २ चांदीचे देव ३० ग्रॅमचे (किंमत २४०० रुपये), चांदीचा दिवा किंमत अंदाजे १००० रुपये, सोनांटा कंपनीची घड्याळ किंमत ३००० रुपये असा एकूण २९,४०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. जयश्री दुतोंडे व विनायक पाटील यांनी शहर पोलीस स्टेशनला चोरी झाल्याची तक्रार १८ जानेवारीला दिली आहे. पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास शहर ठाणेदार प्रदीप साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली ए.पी.आय अभिजीत अहिरराव करत आहेत.