आरटीओ कार्यालय दसऱ्यालाही सुरू राहणार

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दसऱ्याच्या मुहूर्तावर जिल्ह्यात नवीन वाहनांची मोठ्या प्रमाणात खरेदी होत असते. त्या अनुषंगाने नवीन वाहनांना नोंदणी क्रमांक मिळून नागरिकांना वाहनाचा ताबा मिळावा. तसेच शासकीय महसूल जमा व्हावा यासाठी 15 ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या सार्वजनिक सुटीच्या दिवशी प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू राहील, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. वारोकार यांनी बुलडाणा लाइव्हला कळविले …
 
आरटीओ कार्यालय दसऱ्यालाही सुरू राहणार

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दसऱ्याच्या मुहूर्तावर जिल्ह्यात नवीन वाहनांची मोठ्या प्रमाणात खरेदी होत असते. त्या अनुषंगाने नवीन वाहनांना नोंदणी क्रमांक मिळून नागरिकांना वाहनाचा ताबा मिळावा. तसेच शासकीय महसूल जमा व्हावा यासाठी 15 ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या सार्वजनिक सुटीच्या दिवशी प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू राहील, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. वारोकार यांनी बुलडाणा लाइव्हला कळविले आहे.