आरोग्‍य कर्मचारी महिलेचा शारीरिक, मानसिक छळ!; 7 जणांविरुद्ध गुन्‍हा दाखल; खामगावातील घटना

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आरोग्य कर्मचारी असलेल्या 33 वर्षीय विवाहितेचा पैशांसाठी शारीरिक व मानसिक छळ केल्या प्रकरणी खामगाव शहर पोलिसांनी तिच्या पतीसह सासरच्या 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.कंत्राटी आरोग्य सहायिका असलेल्या सौ. मनीषा सचिन अवसरमोल यांनी पती सचिन प्रकाश अवसरमोल, सासरे प्रकाश श्रीराम अवसरमोल, सासू सौ. कांता प्रकाश अवसरमोल, दीर …
 

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः आरोग्‍य कर्मचारी असलेल्या 33 वर्षीय विवाहितेचा पैशांसाठी शारीरिक व मानसिक छळ केल्या प्रकरणी खामगाव शहर पोलिसांनी तिच्‍या पतीसह सासरच्या 7 जणांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.
कंत्राटी आरोग्य सहायिका असलेल्या सौ. मनीषा सचिन अवसरमोल यांनी पती सचिन प्रकाश अवसरमोल, सासरे प्रकाश श्रीराम अवसरमोल, सासू सौ. कांता प्रकाश अवसरमोल, दीर गणेश प्रकाश अवसरमोल, नणंद सौ. निर्मला विश्वजित पाडमुख, नणंद सौ. शुभांगी अमोल बोर्डे, अमोल साहेबराव बोर्डे यांच्‍याविरुद्ध तक्रार दिली. या प्रकरणात खामगाव येथील महिला समुपदेशन केंद्रात आपसी समझोता करण्याचा प्रयत्‍न झाला. मात्र होऊ न शकल्‍याने विवाहितेने 15 मार्चला दुपारी गुन्‍हा दाखल करण्यात आला. विवाहितेने तक्रारीत म्‍हटले आहे, लग्नानंतर पतीसह सासरच्‍या 4 मे 2011 पासून 2019 पर्यंत पगार देण्याच्या कारणावरून तसेच वाहनाचे हप्ते, घर, बांधकाम आदींसाठी वेळोवेळी पैशांची मागणी करून शारीरिक व मानसिक छळ केला. पैसे न आल्यास मुलगा अंश, भाऊ व वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. बहिणीचा संसार उद्‌ध्वस्त करण्याचीही धमकी दिली. तपास पोहेकाँ श्री. जोशी करत आहेत.