आरो प्लांटच्या टिनशेडला तरुणाने घेतला गळफास; नांदुरा तालुक्‍यातील घटना

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नांदुरा तालुक्यातील नारखेड येथील तरुणाने गावातील आरो प्लांटच्या टिनशेडला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना काल, 30 जूनला सायंकाळी 5 च्या सुमारास नारखेड येथे घडली. सागर इनामसिंग डाबेराव (21, रा. नारखेड, ता. नांदुरा) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. महादेव छत्तरसिंग डाबेराव यांनी घटनेची माहिती नांदुरा पोलिसांना …
 

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः नांदुरा तालुक्यातील नारखेड येथील तरुणाने गावातील आरो प्लांटच्या टिनशेडला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना काल, 30 जूनला सायंकाळी 5 च्‍या सुमारास नारखेड येथे घडली. सागर इनामसिंग डाबेराव (21, रा. नारखेड, ता. नांदुरा) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

महादेव छत्तरसिंग डाबेराव यांनी घटनेची माहिती नांदुरा पोलिसांना दिली. त्‍यांचा चुलत भाऊ असलेल्या सागरने कुनसिंग बाबूसिंग डाबेराव यांच्या आरओ प्लांटच्‍या टिनशेडमधील लोखंडी पाईपला मोठा रुमाल बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट नाही. याप्रकरणी नांदुरा पोलिसांनी आकस्मिक मृत्‍यूची नोंद केली आहे. तपास एएसआय श्री. इंगळे करत आहेत.