आर्थिक विवंचनेमुळे ‘ त्याने ‘ निवडला आत्महत्येचा मार्ग! वृद्ध माता-पित्यासह पत्नी निराधार

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः लॉकडाऊनमुळे हिरावलेला नियमित रोजगार, त्यामुळे स्वतःसह माता- पिता व पत्नीचे संगोपन करण्यात येणाऱ्या अडचणी आणि यातून निर्माण झालेल्या आर्थिक विवंचनेतून वरवट बकाल (ता. संग्रामपूर) येथील मजुराने आत्महत्या केली. यामुळे गाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्रदीप हरिश्चंद्र ससाने ( 37) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. जीवन संघर्षच्या …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः लॉकडाऊनमुळे हिरावलेला नियमित रोजगार, त्यामुळे स्वतःसह माता- पिता व पत्नीचे संगोपन करण्यात येणाऱ्या अडचणी आणि यातून निर्माण झालेल्या आर्थिक विवंचनेतून वरवट बकाल (ता. संग्रामपूर) येथील मजुराने आत्महत्या केली. यामुळे गाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

प्रदीप  हरिश्चंद्र ससाने ( 37) असे आत्‍महत्‍या केलेल्याचे नाव आहे. जीवन संघर्षच्या  चक्रव्ह्यूहात अडकलेल्या प्रदीपने 23 मार्च रोजी राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली.  घरातील एकमेव कमावत्या कर्त्या माणसाच्या या आत्मघाताने त्याचे वृद्ध माता पिता व पत्नी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रदीप हा मोलमजुरीचे मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करायचा. लॉकडाऊनमुळे व्यवसाय, उद्योग डबघाईस आले. काही दिवसांपासून कामही मिळत नसल्याने तो विवंचनेत होता, त्यात लग्नाला 10 वर्षे झाल्यावरही मूलबाळ नसल्याने व त्यावरील उपचाराचा खर्च वाया गेल्यानेही तो नैराश्यात होता.

‘प्रहार’ची माणुसकी

दरम्यान या घटनेने गरीब ससाने कुटुंब हादरून गेले. त्यामुळे पोस्टमार्टेमसाठी ने आण करणाऱ्या वाहनाला देण्यासाठी देखील त्यांच्याजवळ पैसे नव्हते. मात्र प्रहार जनसेवक तौसिफ जमादार व अर्जुन सोळंके यांनी स्वतःचे वाहन मोफत देऊन माणुसकीचे दर्शन घडविले.