आळसना- जानोरी रोडने जायचं म्हटलं की शेगावकरांच्या अंगावर येतो काटा!

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शहरातील वर्दळीचा असणारा आळसना- जानोरी रोड खड्डेमय बनला असून, भूमिगत गटारच्या अर्धवट कामामुळे सर्व रस्ता खोदून ठेवल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. 2017 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता काम केले होते. मात्र भूमिगत गटार योजनेसाठीसर्व रस्त्याची दयनीय अवस्था करून ठेवली आहे. याच रस्त्यावर एसटी महामंडळाचे वर्कशॉप असल्याने शेकडो …
 

शेगाव (ज्ञानेश्‍वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शहरातील वर्दळीचा असणारा आळसना- जानोरी रोड खड्डेमय बनला असून, भूमिगत गटारच्या अर्धवट कामामुळे सर्व रस्ता खोदून ठेवल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. 2017 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता काम केले होते. मात्र भूमिगत गटार योजनेसाठीसर्व रस्त्याची दयनीय अवस्था करून ठेवली आहे.

याच रस्त्यावर एसटी महामंडळाचे वर्कशॉप असल्याने शेकडो गाड्या दिवसभर सुसाट असतात. अचानक जर एखाद्या बसमागे दुचाकी असेल तर दोन तीन मिनीटात वाळवंटातून आल्याचा प्रत्यय येतो. मोठ मोठे खड्डे, जागो जागी असलेले गतिरोधक, रस्त्याच्या मधातच नाल्या खोदून ठेवल्याने जीवावर उदार होत वाहन चालवावे लागते. सरस्वतीनगर, राजेश्‍वर कॉलनी, पटवारी कॉलनी, विश्‍वनाथनगर, आझादनगर, मिल्लतनगर, गजानन महाराज नर्सिंग कॉलेज, हरलालका इंग्लिश स्कूल, एफएम इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेणारे हजारो विद्यार्थी या रस्त्याने प्रवास करतात. खड्डेमय रस्ता त्यात धुळीमुळे दमा, अस्थमा असणार्‍या नागरिकांना श्‍वसनाचे त्रास वाढले आहेत. भूमिगत गटार योजनेचे काम करताना कंत्राटदाराने रस्त्याची केलेली ही दुरवस्था तातडीने रस्ता चांगला करून दूर करावी, अशी मागणी होत आहे. कंत्राटदार रस्त्याकड़े दुर्लक्ष करत आहे तर अधिकारीही हेतूपुरस्सर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप वाहनधारक, नागरिक करत आहेत.