आशासेविकांचे सिंदखेड राजात धरणे आंदोलन

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सिंदखेड राजा तालुक्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या विविध मागण्यांसाठी सिंदखेड राजा पंचायत समिती कार्यालयासमोर आशासेविकांनी आज, २१ जूनला धरणे आंदोलन केले. आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांनी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळापासून तहसीलपर्यंत जाऊन तहसीलदार व गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले. आमच्या मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवा, असे साकडे घातले. आंदोलनात …
 

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः सिंदखेड राजा तालुक्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्‍या विविध मागण्यांसाठी सिंदखेड राजा पंचायत समिती कार्यालयासमोर आशासेविकांनी आज, २१ जूनला धरणे आंदोलन केले.

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांनी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळापासून तहसीलपर्यंत जाऊन तहसीलदार व गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले. आमच्या मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवा, असे साकडे घातले. आंदोलनात शारदा देशमुख, भाग्‍यशिला काकडे, रूपाली देशमुख, शोभा गिते, सविता चव्‍हाण, उज्‍जला जाधव, सविता मोरे, मुक्‍ता वाघ, गंगूबाई कुटे, गीता लाड, रूख्मिना सानप, ज्‍योती घुगे, सविता मानतकर, संगिता महाजन, ज्‍योती देशमुख, दुर्गा भालेराव, अंजू पिछोरे, गिता गवई आदींनी भाग घेतला.