आशा सेविकेस दोघांची मारहाण; नांदुरा तालुक्यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ऑक्सिजन पातळी मोजण्यावरून वाद घालत आशा सेविकेस मारहाण करण्यात आल्याची घटना काल, 24 मे रोजी नांदुरा तालुक्यातील कोलासर येथे घडली. याप्रकरणी नांदुरा पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गजानन ओंकार चोपडे व रमेश ओंकार चोपडे यांनी आशा सेविकेसोबत वाद घातला. ऑक्सिजन पातळी तपासणीसाठी का येत नाही व आयुष्यमान …
 
आशा सेविकेस दोघांची मारहाण; नांदुरा तालुक्यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः ऑक्सिजन पातळी मोजण्यावरून वाद घालत आशा सेविकेस मारहाण करण्यात आल्याची घटना काल, 24 मे रोजी नांदुरा तालुक्यातील कोलासर येथे घडली. याप्रकरणी नांदुरा पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गजानन ओंकार चोपडे व रमेश ओंकार चोपडे यांनी आशा सेविकेसोबत वाद घातला. ऑक्सिजन पातळी तपासणीसाठी का येत नाही व आयुष्यमान भारत योजनेवरून सेविकेला मारहाण व शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार आशा सेविकेने नांदुरा पोलीस ठाण्यात दिली आहे.