आश्चर्यम्‌… 1446 उमेदवारांनी फिरवली MPSC कडे पाठ!

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः एकदोनदा नव्हे तब्बल 5 वेळा एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली म्हणून टीका केली, आंदोलन केले अन् दीर्घ प्रतीक्षा केली. मात्र आज, 21 मार्चला परीक्षा घेण्यात आल्यावर तब्बल 1400 पेक्षा जास्त परिक्षार्थींनी चक्क दांडी मारली! यामुळे परीक्षेनंतर शैक्षणिक, प्रशासकीय वर्तुळासह सर्वसामान्य जनतेतही आश्चर्य व्यक्त करण्यात आले. कोरोना प्रकोपामुळे एमपीएससी …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः एकदोनदा नव्हे तब्बल 5 वेळा एमपीएससी  परीक्षा पुढे ढकलली म्हणून टीका केली, आंदोलन केले अन्‌ दीर्घ प्रतीक्षा केली. मात्र आज, 21 मार्चला परीक्षा घेण्यात आल्यावर तब्बल 1400 पेक्षा जास्त परिक्षार्थींनी चक्क दांडी मारली!  यामुळे परीक्षेनंतर शैक्षणिक, प्रशासकीय वर्तुळासह सर्वसामान्य जनतेतही आश्चर्य व्यक्त करण्यात आले.

कोरोना प्रकोपामुळे एमपीएससी पूर्व परीक्षा पाचवेळा पुढे ढकलण्यात आली. यामुळे आयोगासह राज्य सरकारला सर्वांनीच धारेवर धरले. 14 मार्चच्या परीक्षेला पुढे ढकलल्यावर अगदी बुलडाणा, चिखलीमध्ये परीक्षार्थी व पक्षांनी आंदोलने केलीत. या पार्श्वभूमीवर आज एकदाची ही परीक्षा सुरळीत व कोरोना विषयक कडक बंदोबस्तात पार पडली. शहरातील 12 केंद्रांवर नोंदणी झालेल्या 3911 परिक्षार्थींसाठी व्यवस्था करण्यात आली. सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेदरम्यान आयोजित पहिल्या पेपरसाठी यापैकी तब्बल 1432  महाभाग केंद्राकडे फिरकलेच नाय! यामुळे 2479 जणांनीच परीक्षा दिली, दुपारी 3 ते 5 दरम्यान झालेल्या दुसऱ्या पेपरला याचीच पुनरावृत्ती झाली! तब्बल 1446 परिक्षार्थीनी दुसऱ्या पेपरकडे पाठ फिरविली. केंद्रात 2465 जणांनीच परीक्षा देण्याचे आव्हान स्वीकारले. यामुळे संध्याकाळी  यावर सुरू झालेली खमंग चर्चा आणखी काही दिवस रंगणार हे उघड आहे.