आसाम वगळता चार राज्यांत होईल भाजपचा पराभव-शरद पवार

मुंबई : पुढील महिन्यात पाच राज्यांत विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.केंद्रातील सत्ताधारी भाजपने त्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा विविध राज्यांत सभा घेऊन वातावरण ढवळून काढत आहेत. या निवडणुकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी मात्र या निवडणुकीबाबत वेगळेच भाकित केले आहे. आसाम वगळता उर्वरीत चार राज्यांत भाजपचा मोठा पराभव होईल, …
 

मुंबई : पुढील महिन्यात पाच राज्यांत विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.केंद्रातील सत्ताधारी भाजपने त्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा विविध राज्यांत सभा घेऊन वातावरण ढवळून काढत आहेत. या निवडणुकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी मात्र या निवडणुकीबाबत वेगळेच भाकित केले आहे. आसाम वगळता उर्वरीत चार राज्यांत भाजपचा मोठा पराभव होईल, असा दावा शरद पवार यांनी केला आहे. बारामती येथे पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले की, पाच राज्यांतील निवडणुकांवर आज सांगणे कठीण आहे. परंतु लोक योग्य तो निर्णय घेतील. त्या राज्यांतील स्थिती मला माहीत आहे.पण भाजपला आसाम वगळता कुठली सत्ता मिळेल असे वाटत नाही. प. बंगालमध्ये ममता मोदी सरकार व भाजपविरुद्ध एकाकी लढत आहेत. तेथे भाजप केंद्रीय सत्तेचा गैरवापर करत आहे, असा आरोपही पवारांनी केला.आसाम, केरळ, तमिळनाडू, प. बंगाल व पुड्डुचेरी या राज्यांत निवडणुका होत आहेत.