आ. गायकवाडांची कार जाळणारे ते चौघे कोण? सोमवारी येणार समोर??

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सुपारी देऊन, कट शिजवून माझी कार जाळण्यात आली. पोलीस यंत्रणा तपासात अपयशी ठरली असली तरी माझ्या यंत्रणेने याचा तपास केला आहे. गाडी कुणी जाळली हे मला माहीत आहे. त्यामुळे सोमवारी याबद्दल पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करणार आहे. शहरातली चार लोक त्या कटात सहभागी आहेत, असे स्पष्टीकरण आमदार संजय गायकवाड यांनी आज, …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः सुपारी देऊन, कट शिजवून माझी कार जाळण्यात आली. पोलीस यंत्रणा तपासात अपयशी ठरली असली तरी माझ्या यंत्रणेने याचा तपास केला आहे. गाडी कुणी जाळली हे मला माहीत आहे. त्यामुळे सोमवारी याबद्दल पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करणार आहे. शहरातली चार लोक त्या कटात सहभागी आहेत, असे स्‍पष्टीकरण आमदार संजय गायकवाड यांनी आज, ८ जुलैला दिले. त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

२६ मे रोजी भल्या पहाटे आमदार संजय गायकवाड यांच्या निवासस्थानासमोर उभी असलेली त्यांची इनोव्हा कार जाळण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास बुलडाणा शहर पोलीस करत होते. मात्र पोलीस यंत्रणा तपासात अपयशी ठरल्याचे आमदार गायकवाड म्हणाले. गाडी जाळण्याचा कट कुठे शिजला, ती कुणी जाळली, यात कोण कोण सहभागी होते याचा खोलवर तपास मी व माझ्या यंत्रणेने केला असल्याचे त्यांनी सांगितले. यात राजकीय व्यक्तींचा सहभाग असल्याचेही ते म्हणाले.