इंधन दरवाढीविरोधात जिल्हाभर काँग्रेसचा आक्रोश!; तालुक्‍याच्‍या ठिकाणी झाली आंदोलने

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पेट्रोल व गॅस दरवाढीच्या विरोधात आज, 8 मार्चला जिल्हा काँग्रेसने तालुक्याच्या ठिकाणी आक्रोश आंदोलन केले. त्या त्या तहसीलदारांना केंद्र सरकारच्या निषेधाचे निवेदन देत इंधन दरवाढ कमी करण्याची मागणी केली. पेट्रोल ,डिसेल व गॅसच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत.पेट्रोलने शंभरी पार केली तर स्वयंपाकाचा गॅस सुद्धा 850 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे जिल्हा …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः पेट्रोल व गॅस दरवाढीच्या विरोधात आज, 8 मार्चला जिल्हा काँग्रेसने तालुक्‍याच्‍या ठिकाणी आक्रोश आंदोलन केले. त्‍या त्‍या तहसीलदारांना केंद्र सरकारच्या निषेधाचे निवेदन देत इंधन दरवाढ कमी करण्याची मागणी केली. पेट्रोल ,डिसेल व गॅसच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत.पेट्रोलने शंभरी पार केली तर स्वयंपाकाचा गॅस सुद्धा 850 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे जिल्हा काँग्रेसध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन झले. कोरोना पॉझिटिव्ह असल्याने श्री. बोंद्रे आंदोलनात सहभागी होऊ शकले नाही.

चिखली

चिखलीत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. कोरोनाच्‍या प्रादुर्भावामुळे प्रतिकात्मक स्वरूपात हे आंदोलन करण्यात आले. निवेदनावर तालुकाध्यक्ष विष्णू पाटील कुळसुंदर, समाधान सुपेकर, शहर अध्यक्ष अतहराद्यीन काझी, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव राम डहाके, विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष बाळु साळोख, डॉ. सत्येंद्र भुसारी, जिल्हा काँग्रेस सरचिटणीस डॉ. मोहम्मद इसरार, जाकीर भाई, संजय गिरी, दीपक खरात, संगिताताई गाडेकर, ईश्वर इंगळे, अॅड. प्रशांत देशमुख, साहेबराव मोरे, शेषराव चैथे, राजू रज्जाक, फैज पठाण, अ. बसीद, डॉ. संजय घुगे, डॉ. अमोल लहाने यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मेहकर

मेहकर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष देवानंद पवार आणि नगराध्यक्ष कासम भाई गवळी यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश आंदोलन करण्यात आले. आंदोलनास जानेफळ चौकातून सुरुवात करण्यात आली. उपविभागीय कार्यालयात जाऊन निवेदन देण्यात आले. आंदोलनात सायकल रॅलीचाही सहभाग  होता. केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनात वसंतराव देशमुख, पंकज हजारी, गजेंद्र माने, नीलेश मानवतकर, आलियार खान, नीलेश सोमण, संजय ढाकरके, मुजीब खान, उस्मान शहा, अनिल चांगाडे, स्मित सावजी, अजगर शेख, सलमान शेख, मनोज गोरे आदींचा सहभाग ता.

नांदुरा

नांदुरा तालुका व शहर समितीतर्फे महिला, युवक, एनएसयुआयच्‍या सहकार्याने शहरातील गणी पेट्रोलपंपासमोर आमदार राजेश एकडे यांच्या मार्गदर्शनाखाली जनआक्रोश आंदोलन झाले. जिल्‍हा सरचिटणीस नीलेश पाऊलझगडे, तालुकाध्यक्ष भगवान धांडे, ॲड. मोहतेशाम रजा, जिल्हा पुनर्वसन समितीचे सदस्य तथा पातोंडा येथील  सरपंच पुरुषोत्तम झाल्टे, माजी पंचायत समिती सदस्य प्रसाद पाटील, राजू हाडे पाटील, ज्ञानेश्वर डांबरे, केशवराव मापारी, इक्बाल खान, किसन भगत, संजू इटखेडे, किसना इंगळे, महेंद्र देशमुख, विनलकुमार मिरगे, जयसेन सरदार, शालिग्राम तांगडे, संजय बाठे, शंकरभाऊ बोदळे, शुभम लांडे, वासुदेव वावगे, सोपान फाडके, दीपक काळे, पांडुरंग किसन तायडे, चंद्रकांत इंगळे, शत्रुघ्न काळे, ज्ञानेश्वर हरिचंद्र देठे, अक्षय वनारे, अमोल तांदळे, मिलिंद मोरे, वैभव साबे पाटील, सुनील वेरुळकर, सागर काटे पाटील, गजनान उन्हाळे, महेंद्र गजानन देशमुख, विष्णू पाटील, भास्कर वाकोडे उपस्थित होते.

मलकापूर

 मलकापूर येथे तहसीलदारांना निवेदत देत आक्रोश करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष अॅड. हरीश रावळ, उपनगराध्यक्ष हाजी रशीद खाँ जमदार, बंडू चौधरी, राजू पाटील, दिलीप गोळीवाले, मनोहर पाटील, वाजिद कुरेशी, सौ. मंगलाताई पाटील,सौ. शोभा मराठे,सौ. सुनंदा पवार, सौ. पंचफुला पाटील, अॅड. संजय वानखेडे, मेहबूब खान, झाकीर मेमन, तुषार साबळे, सुरेश भोजने, अनिल जयस्वाल, अशोक मराठे, विनय काळे, रौफ शेठ, युसूफ खान, ज्ञानदेव तायडे, रमेश खाचने, डॉ.अनिल खर्चे, राजू वाडेकर, शिरीष डोरले, विनायक देशमुख, प्रवीण दाते, जानराव पाटील, संतोष मराठे, सौरभ चव्हाण, मंगेश झरे, गजानन वाघ, मोहन सोनी, दीपक जाधव, गोविंद रहाटे, शहजाद खान ,रोशन देशमुख, किशोर पाचपांडे, राकेश पाटील, राजेंद्र पाटील, भूषण सनिसे व समाधान इंगळे आदी उपस्थित होते.

शेगाव

शेगाव येथे झालेल्या आंदोलनात जिल्हा उपाध्यक्ष तथा शेगावचे माजी नगराध्यक्ष शैलेंद्र पाटील, माजी नगराध्यक्ष शिवाजीराव बुरुंगले, जिल्‍हा सरचिटणीस कैलास देशमुख, रहिम खाँ भाई, शहराध्यक्ष दीपक सलामपुरिया, तालुकाध्यक्ष विजय काटोले, माजी नगरसेवक संदीप काळे, ज्‍येष्ठ नेते डी. के. शेगोकार, गोपाल कलोरे, दिलीप पटोकार, ज्ञानेश्वर शेजोळे, नासीर सैलानी, अनंता शेळके, अनिल सावळे आदींचा सहभाग होता.