इच्‍छेविरोधात लग्‍न झाल्‍याने अल्पवयीन मुलीने गाठले पोलीस ठाणे; मलकापुरातील घटना

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देणाऱ्या आई-वडिलांसह तिच्या पती, सासू-सासऱ्याविरुद्ध मलकापूर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी मुलीनेच आपल्या इच्छेविरोधात लग्न झाल्याची तक्रार दिली आहे. मलकापूर शहरातील फुकटपुरा येथील 16 वर्षीय मुलीचा विवाह तिचे वडील विजय खंडारे, आई अनुराधा यांनी किशोर वसंत वानखेडे याच्यासोबत लावला होता. वाकोडी येथील स्वयंभू …
 

मलकापूर (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देणाऱ्या आई-वडिलांसह तिच्‍या पती, सासू-सासऱ्याविरुद्ध मलकापूर शहर पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे. या प्रकरणी मुलीनेच आपल्या इच्‍छेविरोधात लग्‍न झाल्‍याची तक्रार दिली आहे.

मलकापूर शहरातील फुकटपुरा येथील 16 वर्षीय मुलीचा विवाह तिचे वडील विजय खंडारे, आई अनुराधा यांनी किशोर वसंत वानखेडे याच्‍यासोबत लावला होता. वाकोडी येथील स्वयंभू शिवमंदिरात हा विवाह 28 मे रोजी झाला. मात्र विवाह इच्‍छेविरोधात झाल्याची तक्रार मुलीने पोलिसांत दिल्याने पोलिसांनी आई, वडील, पतीसह सासरा वसंत वानखेडे व सासूविरुद्धही गुन्‍हा दाखल केला आहे.